spot_img
spot_img
spot_img

महावितरणच्या नावाखाली वार्ताहराची बदनामी? दुकानदारांमध्ये संभ्रम पसरविणाऱ्यांचा शोध घ्या! तक्रार केलीच नाही, मग वार्ताहराचे नाव दुकानदारांपर्यंत पोहोचले कसे? महावितरणने खुलासा करावा; पोलिसांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी

महावितरणच्या नावाखाली वार्ताहराची बदनामी? दुकानदारांमध्ये संभ्रम पसरविणाऱ्यांचा शोध घ्या!

 

तक्रार केलीच नाही, मग वार्ताहराचे नाव दुकानदारांपर्यंत पोहोचले कसे? महावितरणने खुलासा करावा; पोलिसांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी

 

राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी)

 

राशीन येथील फटाका दुकानदारांविरोधात महावितरण कार्यालयात एका वार्ताहराने तक्रार केल्याची माहिती दुकानदारांमध्ये पसरल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संबंधित वार्ताहराने आपण कोणतीही लेखी तक्रार किंवा अर्ज महावितरणकडे दिलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग तक्रार केली नसताना वार्ताहराचे नाव दुकानदारांपर्यंत पोहोचवले कोणी? महावितरणच्या नावाखाली चुकीची माहिती पसरविण्यामागे नेमके कोण आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

 

विशेष म्हणजे, एका फटाका दुकानदाराने थेट वार्ताहराला फोन करून, ‘तुम्ही आमच्याविरोधात महावितरणकडे तक्रार केली आहे का?’ अशी विचारणा केली. त्यावर वार्ताहराने तक्रार केली नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे तक्रार नसताना तक्रारदार म्हणून नाव पुढे आलेच कसे, याचा उलगडा होणे आवश्यक आहे.

 

तक्रारीचा आवक क्रमांक कुठे?

 

महावितरण कार्यालयात खरोखरच तक्रार दाखल झाली असेल, तर तिचा आवक क्रमांक, अर्जाची प्रत आणि कार्यालयीन नोंद प्रशासनाने समोर आणावी. तक्रारच प्राप्त झाली नसेल, तर वार्ताहराने तक्रार केल्याची माहिती दुकानदारांमध्ये कोणी पसरवली, याची चौकशी करावी. केवळ मौन बाळगून महावितरण प्रशासनाला या प्रश्नांपासून पळ काढता येणार नाही.

 

कुणाच्या सांगण्यावरून नाव पुढे आले?

 

संबंधित दुकानदारांचे जबाब नोंदवून त्यांना ही माहिती कोणी दिली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. उपलब्ध कॉल रेकॉर्डिंग, संदेश आणि कार्यालयीन नोंदींची पडताळणी करावी. महावितरणमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका आहे का किंवा बाहेरील कोणीतरी महावितरणच्या नावाचा वापर करून गैरसमज पसरवला आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे.

 

पोलिसांनीही स्वतंत्र चौकशी करावी!

 

या प्रकारामुळे वार्ताहर आणि दुकानदारांमध्ये विनाकारण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनीही संबंधितांची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. कोणाकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविण्यात आली असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

वार्ताहराचा स्पष्ट सवाल :

 

“मी महावितरण कार्यालयात कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही किंवा अर्ज दिलेला नाही. मग माझे नाव घेऊन दुकानदारांमध्ये तक्रारीची माहिती कोणी पसरवली? माझ्या नावाचा वापर करून मला दुकानदारांच्या रोषाला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण केली जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. महावितरणने अधिकृत खुलासा करावा आणि पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे.”

 

आता महावितरण प्रशासनाने स्पष्ट करावे की तक्रार नसताना वार्ताहराचे नाव पुढे आले कसे? पत्रकाराच्या नावाचा कथित गैरवापर करून संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा शोध लागणार का? या प्रकरणात सत्य बाहेर येऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे राशीनकरांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त! कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा;...

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त!   कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा; तीन गायींची सुटका, एक आरोपी...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती! दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती!   दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नांकडे शेतकऱ्यांचे लक्ष   राशीन |...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!