spot_img
spot_img
spot_img

अहिल्यानगर जिल्ह्यात गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचा चौकार! चार ठिकाणी छापे; ५.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त श्रीगोंदा आणि श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तीन आरोपी फरार, सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अहिल्यानगर जिल्ह्यात गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचा चौकार! चार ठिकाणी छापे; ५.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

श्रीगोंदा आणि श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तीन आरोपी फरार, सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 

अहिल्यानगर | प्रतिनिधी ऋषभ परदेशी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. श्रीगोंदा आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल ५ लाख ६५ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तीन पथके तयार करून कारवाईसाठी रवाना केली.

 

दिनांक ११ नोव्हेंबर रोजी या पथकांनी श्रीगोंदा आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहितीच्या आधारे चार ठिकाणी छापे टाकले.

 

चार कारवायांचा तपशील

 

१) घोगरगाव, श्रीगोंदा : दादासाहेब मारुती शिंदे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या ठिकाणी ५ हजार १८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लल्लू गायकवाड फरार आहे.

 

२) घोगरगाव, श्रीगोंदा : निसार मुसा शेख याच्याविरुद्ध कारवाई करून १० हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजू शेख (पूर्ण नाव माहीत नाही) फरार आहे.

 

३) ढोरजे, श्रीगोंदा : विकास सुखदेव कोहक याच्याविरुद्ध कारवाई करत सर्वाधिक ५ लाख १९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सूरज बोराणा फरार आहे.

 

४) अशोकनगर, श्रीरामपूर : बबलू उर्फ नितेश सुरेश मेनकुदळे याच्याविरुद्ध कारवाई करून ३० हजार ५४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रतन यादव पराड आणि सोमनाथ संपत शिंदे हे दोघे फरार आहेत.

 

या चारही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.

 

अवैध गुटखा विक्रीचे जाळे जिल्ह्यात आणखी किती खोलवर पसरले आहे? फरार आरोपींचा शोध घेऊन या अवैध व्यवसायाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त! कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा;...

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त!   कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा; तीन गायींची सुटका, एक आरोपी...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती! दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती!   दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नांकडे शेतकऱ्यांचे लक्ष   राशीन |...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!