५ हजार पणत्यांनी उजळला ऐतिहासिक धर्मवीरगड!
पेडगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य दीपोत्सव; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने गड परिसर दुमदुमला!

श्रीगोंदा ( प्रतिनिधी सागर शेळके) : पेडगाव येथील ऐतिहासिक श्री धर्मवीरगडावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य दीपोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी तब्बल ५ हजार पणत्या प्रज्वलित करून लक्ष्मीनारायण मंदिर, पाताळेश्वर, रामेश्वर, राजदरबारासह संपूर्ण गड परिसर उजळविण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग व बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्यात शेकडो शिवभक्त, धारकरी व ग्रामस्थ सहभागी झाले. ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी राजेश नेलगे व प्रतीक पाचपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

















