# हिंदुहृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्त राशीनमध्ये शिवसैनिकांकडून प्रतिमेस अभिवादन!

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार अर्पण; ज्येष्ठ शिवसैनिकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
**राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी**
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता राशीन शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसैनिकांनी अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी, हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या आक्रमक नेतृत्वाने आणि निर्भीड विचारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.
या अभिवादन कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राशीन शहरप्रमुख जितेंद्र शेटे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील काका दडगळ, रमेश परदेशी, अमोल दळवी, विकी साळवे, साहिल शेख, दादा राऊत, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार महादेव सायकर काळे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















