spot_img
spot_img
spot_img

५ हजार पणत्यांनी उजळला ऐतिहासिक धर्मवीरगड! पेडगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य दीपोत्सव; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने गड परिसर दुमदुमला!

५ हजार पणत्यांनी उजळला ऐतिहासिक धर्मवीरगड!

 

पेडगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य दीपोत्सव; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने गड परिसर दुमदुमला!

श्रीगोंदा ( प्रतिनिधी सागर शेळके) :                         पेडगाव येथील ऐतिहासिक श्री धर्मवीरगडावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य दीपोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी तब्बल ५ हजार पणत्या प्रज्वलित करून लक्ष्मीनारायण मंदिर, पाताळेश्वर, रामेश्वर, राजदरबारासह संपूर्ण गड परिसर उजळविण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग व बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्यात शेकडो शिवभक्त, धारकरी व ग्रामस्थ सहभागी झाले. ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी राजेश नेलगे व प्रतीक पाचपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त! कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा;...

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त!   कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा; तीन गायींची सुटका, एक आरोपी...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती! दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती!   दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नांकडे शेतकऱ्यांचे लक्ष   राशीन |...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!