spot_img
spot_img
spot_img

३० वर्षांचा अंधार दूर; लक्ष्मीआई मंदिरात अखेर प्रकाश! ग्रामस्थांच्या एकजुटीला यश; १४ दानशूर व्यक्तींचे ६ हजार ६०० रुपयांचे योगदान

३० वर्षांचा अंधार दूर; लक्ष्मीआई मंदिरात अखेर प्रकाश!

 

ग्रामस्थांच्या एकजुटीला यश; १४ दानशूर व्यक्तींचे ६ हजार ६०० रुपयांचे योगदान

Oplus_16908288

घोगरगाव : प्रतिनिधी सागर शेळके

 

घोगरगाव येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीआई मंदिरात तब्बल ३० वर्षांपासून विजेची सुविधा नव्हती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर ग्रामस्थांच्या पुढाकाराने आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मार्गी लागला आहे. मंदिरात विद्युत व्यवस्था सुरू झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

मंदिरात वीज नसल्यामुळे धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि सायंकाळच्या वेळी भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. त्याला इतर ग्रामस्थांनी आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रतिसाद दिला. या कामासाठी वायरमन हरीभाऊ बेरड यांनी विशेष सहकार्य केले.

 

या उपक्रमासाठी बाळासाहेब उगले, शिवाजी उल्हारे, वामन उल्हारे, बाबासाहेब उल्हारे, निळकंठ उल्हारे, संदीप उल्हारे, निखिल उल्हारे, अरुण उल्हारे, पप्पू कोतवाल, अवधूत साठे, अक्षय उल्हारे, मिलिंद भोसले आणि संपत तरटे यांनी प्रत्येकी ५०० रुपये, तर हरी बेरड यांनी १०० रुपये देणगी दिली. अशा प्रकारे एकूण ६ हजार ६०० रुपयांची देणगी जमा झाली.

 

या सर्व दानशूर व्यक्तींचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. आई लक्ष्मी त्यांच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य देवो, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

 

मंदिराच्या विकासासाठी आवाहन

 

लक्ष्मीआई मंदिराच्या आगामी विकासकामांसाठी आणखी काही दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मदत करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी अवधूत साठे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

 

ग्रामस्थांची एकजूट आणि सामाजिक सहकार्याच्या जोरावर ३० वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागल्याने घोगरगावमध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त! कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा;...

कत्तलीसाठी तीन जर्सी गायींची निर्दयी वाहतूक; नगर तालुका पोलिसांचा टेम्पोसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त!   कामरगाव घाटात पोलिसांचा सापळा; तीन गायींची सुटका, एक आरोपी...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती! दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित...

श्रीगोंद्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती!   दादासाहेब जंगले पाटील यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती; शासन निर्णय जारी, वर्षानुवर्षे प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नांकडे शेतकऱ्यांचे लक्ष   राशीन |...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!