घोगरगावचे सुपुत्र कैलास आबासाहेब तरटे यांची विस्तार अधिकारीपदी पदोन्नती
घोगरगाव | प्रतिनिधी सागर शेळके
घोगरगावचे सुपुत्र कैलास आबासाहेब तरटे यांची पंचायत समिती, कर्जत येथे विस्तार अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल घोगरगावसह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कैलास तरटे यांनी शासकीय सेवेत कार्यरत असताना आपल्या कामातून कार्यक्षमता व जबाबदारीची जाणीव जपत उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना विस्तार अधिकारीपदाची जबाबदारी मिळाली आहे. या पदोन्नतीमुळे घोगरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नवीन पदावर काम करताना ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ते योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कैलास आबासाहेब तरटे यांच्या पदोन्नतीबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार, सहकारी व हितचिंतकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

















