spot_img
spot_img
spot_img

# कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचा भडका! प्रत्येकी माणसाला ४० लिटर पाणी द्या; शिवसेनेची सरकारकडे मागणी ! **दुष्काळात जनावरांच्या तहानेचे काय? पाणीवाटपाचे निकष बदला; शिवसेना तालुकाप्रमुख नितीन तोरडमल यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी**

# कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचा भडका! प्रत्येकी माणसाला ४० लिटर पाणी द्या; शिवसेनेची सरकारकडे मागणी !

 

**दुष्काळात जनावरांच्या तहानेचे काय? पाणीवाटपाचे निकष बदला; शिवसेना तालुकाप्रमुख नितीन तोरडमल यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी**

Oplus_16908288

**राशीन (प्रतिनिधी) : ऋषभ परदेशी** अहिल्यानगर जिल्ह्यासह कर्जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मिळणारे पाणी अपुरे पडत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती २० लिटर, तर नागरी भागात ३० लिटर पाणीपुरवठ्याच्या निकषांमध्ये बदल करून सरसकट प्रतिव्यक्ती ४० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख नितीन लता ईश्वर तोरडमल यांनी केली आहे. यासोबतच तहानेने व्याकूळ होणाऱ्या जनावरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

दुष्काळाचे सावट गडद होत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ, पाण्याचे मर्यादित स्रोत आणि वाढती गरज या पार्श्वभूमीवर सध्याचे पाणीवाटपाचे निकष बदलण्याची आवश्यकता असल्याचे तोरडमल यांनी निवेदनात नमूद केले आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रतिव्यक्ती पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढवावे आणि पाणीटंचाईग्रस्त भागांना दिलासा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

 

### माणसांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; मुक्या जनावरांचे हाल कोण थांबवणार?

 

**दुष्काळात माणसांसोबत जनावरांचाही पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जबाबदारी कोण घेणार?** असा महत्त्वाचा मुद्दा या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्पष्ट शासन निर्देश नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक व्यवस्था होत नसल्याची बाब तोरडमल यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

 

जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याबाबत शासनाने स्पष्ट धोरण आखावे, संबंधित यंत्रणांना तातडीने निर्देश द्यावेत आणि दुष्काळग्रस्त गावांमध्ये आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पाण्याअभावी नागरिकांसह पशुधनालाही गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता या मागणीमागे व्यक्त होत आहे.

 

### उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन; मंत्र्यांनाही प्रत

 

शिवसेना तालुकाप्रमुख नितीन तोरडमल यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनाही निवेदनाची प्रत माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.

 

### आता शासनाच्या निर्णयाकडे लक्ष!

 

दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढविणे, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे आणि प्रशासनाला स्पष्ट निर्देश देणे या मागण्यांवर शासन काय भूमिका घेते, याकडे कर्जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. **पाणी ही मूलभूत गरज असताना दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कागदोपत्री तरतुदींपलीकडे जाऊन प्रत्यक्ष उपाययोजना होणार का?** हा प्रश्न या निवेदनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!