spot_img
spot_img
spot_img

दुकानदाराचा परवाना रद्द होणार का? ‘अभय’ कोणाचे? शेतकऱ्याच्या आरोपामुळे चर्चेला उधाण

दुकानदाराचा परवाना रद्द होणार का? ‘अभय’ कोणाचे? शेतकऱ्याच्या आरोपामुळे चर्चेला उधाण

Oplus_16908288

मंगेवाडी (ता. सांगोला) | प्रतिनिधी : सागर शेळके

 

मंगेवाडी येथील 400 डाळिंब झाडांच्या नुकसानीच्या प्रकरणात आता संबंधित कृषी औषध विक्रेत्याचा परवाना रद्द होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. कृषी केंद्रातून औषधे खरेदी करून फवारणी केल्यानंतर बागेचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी तात्यासाहेब विठ्ठल कोळेकर यांनी केला आहे.

Oplus_16908288

विशेष म्हणजे, संबंधित औषध विक्रेत्याने बागेत येऊन औषधांचा डेमो देण्याचे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात डेमो देण्यात आला नसल्याचे शेतकऱ्याने पत्रकारांसमोर सांगितले. त्यानंतर फवारणी केल्यावर दुसऱ्याच दिवशी झाडांची पानगळ सुरू झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

Oplus_16908288

दुकानात किती प्रकारची औषधे? परवाना आणि साठ्याची तपासणी होणार का?

 

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित कृषी केंद्राचा वैध परवाना, दुकानातील औषधांचा साठा, बॅच क्रमांक, बिलांची नोंद, औषधांची गुणवत्ता आणि विक्रीची पद्धत यांची कृषी विभागाकडून तपासणी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी विभागाकडे कीटकनाशकांच्या नमुन्यांची तपासणी आणि विक्री केंद्रांची तपासणी करण्याची व्यवस्था आहे.

 

‘दुकानदाराला कोणाचे अभय?’

 

“माझ्या नुकसानीची भरपाई दुकानदाराकडूनच मिळावी. संबंधित दुकानदाराला कोणाचे अभय आहे? या प्रकरणात कोणाचे राजकीय पाठबळ आहे का?” असा प्रश्न शेतकऱ्याने पत्रकारांसमोर उपस्थित केल्याचे सांगितले. मात्र, या आरोपांना अद्याप कोणताही स्वतंत्र पुरावा समोर आलेला नाही.

 

त्यामुळे कृषी विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दुकानदाराचा परवाना, औषधांचा साठा, संबंधित बॅचचे नमुने आणि विक्रीची कागदपत्रे तपासावीत, अशी मागणी होत आहे.

 

शेतकऱ्याने दि. 6 ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी, सांगोला यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आता कृषी विभाग पंचनामा करून नमुने घेतो का आणि तपासणीत दोष आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर काय कारवाई होते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!