spot_img
spot_img
spot_img

आंदोलनासाठी मुंबईत गेलेल्या अहिल्यानगर CJP टीमचा साधेपणाचा आदर्श; घरून आणलेली भाजी-चपाती, फुटपाथवर सामूहिक भोजन*

 

*आंदोलनासाठी मुंबईत गेलेल्या अहिल्यानगर CJP टीमचा साधेपणाचा आदर्श; घरून आणलेली भाजी-चपाती, फुटपाथवर सामूहिक भोजन*

 

अहिल्यानगर, दि. २ ऑक्टोबर २०२६ :

मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित आंदोलनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून CJPच्या कार्यकर्त्यांची टीम सहभागी झाली होती.

आंदोलनासाठी मुंबईला जाताना कार्यकर्त्यांनी आपल्या घरूनच भाजी आणि चपाती सोबत आणली.

आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर कोणताही दिखावा न करता कार्यकर्त्यांनी फुटपाथवर बसून घरून आणलेले जेवण एकत्रितपणे केले. या प्रसंगातून कार्यकर्त्यांमधील आपुलकी, एकजूट आणि साधेपणाचे दर्शन घडले.

यावेळी डॉ. नितीन दिघे, सुशीलकुमार शेळके, महेश सटाले सर, प्रथमेश दरेकर, राजेंद्र सटाले सर, राहुल गांगर्डे, टी. डी. वणवे, सागर शेळके, पूृथ्वीराज सुरते

पावन सुकासे यांच्यासह CJPचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

“आंदोलनासाठी मोठ्या सुविधा किंवा दिखाव्याची गरज नसते; आपल्या विचारांवर विश्वास आणि एकमेकांची साथ असणे महत्त्वाचे आहे,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 

अहिल्यानगर CJP टीमने आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका मांडण्यासोबतच साधेपणा, परस्पर सहकार्य आणि संघभावनेचा संदेश दिला.

 

— CJP अहिल्यानगर टीम

संपर्क सुशीलकुमार शेळके

8055030606

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!