spot_img
spot_img
spot_img

राशीनमध्ये शिवसेनेची आढावा बैठक; पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

राशीनमध्ये शिवसेनेची आढावा बैठक; पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना कर्जत तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांच्या आदेशाने आणि राशीन शहरप्रमुख नाझीमभाई काझी यांच्या नेतृत्वाखाली राशीन येथील श्री जगदंबा भक्तनिवास येथे शिवसेनेची आढावा बैठक पार पडली.

सायंकाळी ६ वाजता झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १, ३ व ६ मधील शाखा व उपशाखा प्रमुखांच्या निवडी तसेच पक्ष संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी प्रभाग क्रमांक १ शाखाप्रमुखपदी मच्छिंद्र तुकाराम माने, उपशाखाप्रमुखपदी दत्तात्रय बाजीराव जाधव व राजू पांडुरंग उकिरडे, तर प्रभाग क्रमांक ३ शाखाप्रमुखपदी अतुल अरुण वाघुले यांची निवड करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये सागर ज्ञानदेव परदेशी यांची शाखाप्रमुखपदी, तर गणेश विठ्ठल पोळ व सुभाष कैलास पवळ यांची उपशाखाप्रमुखपदी निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना राशीन उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर बाप्पू शिंदे, दादासाहेब सरोदे, ज्येष्ठ शिवसैनिक, दादासाहेब शेळके, बाळासाहेब माने  मिलिंद बाप्पू रेणुके, मेजर विलास बाप्पू कानगुडे, शिवसेना कर्जत तालुका शेतकरी आघाडीचे साजिदभैय्या काझी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!