राशीनच्या नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाची नियोजन बैठक
राशीन दैनिक राष्ट्र सह्याद्री (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : राशीन येथील श्री जगदंबा देवी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच विविध प्रशासकीय बाबींच्या नियोजनासाठी ५ /10/2026 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता श्री जगदंबा देवी मंदिरात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्टच्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कर्जत रवि सात्वन यांनी संबंधित विभागांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

यंदाचा नवरात्रोत्सव ११ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घड ू नय े तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे.
बैठकीस गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, महावितरण, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत तसेच श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष व पुजारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

















