spot_img
spot_img
spot_img

दुष्काळी पाणीपुरवठ्याचा प्रश्न : प्रशासनाकडून सिना धरण व पाणी प्रकल्पाची पाहणी

दुष्काळी पाणीपुरवठ्याचा प्रश्न : प्रशासनाकडून सिना धरण व पाणी प्रकल्पाची पाहणी

प्रतिनिधी श्रीगोंदा…  सागर शेळके

अहिल्यानगर | प्रतिनिधी : मांडवगण, बांगर्डी, खांडगाव, माहाडुळवाडी परिसरातील दुष्काळी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणा फराटे, माजी उपसरपंच रामदास घोडके, ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी पाहणी केली.

यावेळी मांदळी येथील पाणी टँकर भरण्याच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली. तसेच मांदळी व निमगाव गांगर्डा परिसरातील सिना धरणातील पाणीपातळीची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर थिटेसांगवी येथील पाणी फिल्टर प्रकल्पाला भेट देऊन पाणी शुद्धीकरण व वितरण व्यवस्थेची माहिती घेण्यात आली. तसेच मांदळी गावातील नायरा पंपासमोरील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

 

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी धरणातील उपलब्ध पाणीसाठा, टँकर भरण्याची व्यवस्था, पंपाची कार्यक्षमता, फिल्टर प्रकल्प तसेच गावनिहाय पाणी वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

 

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करणे, टँकर भरण्याची व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि संबंधित गावांतील नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!