spot_img
spot_img
spot_img

निष्ठावंत शिवसैनिक सुभाष जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी! कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुखपदी निवड; दीर्घकाळाच्या संघटनात्मक कार्याला मिळाले निष्ठेच फळ

निष्ठावंत शिवसैनिक सुभाष जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी!

 

कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुखपदी निवड; दीर्घकाळाच्या संघटनात्मक कार्याला मिळाले पदाचे निष्ठेच फळ

 

राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक श्री. सुभाष जाधव, राशीन यांची कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये सुभाष जाधव यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुभाष जाधव यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत पक्षाशी असलेली आपली निष्ठा आणि कार्यतत्परता कायम ठेवली. शाखाप्रमुख, उपशहरप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, तालुका समन्वयक, विधानसभा समन्वयक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता त्यांची विधानसभा प्रमुखपदी निवड झाली आहे.

पक्षाच्या कठीण काळातही संघटनेशी असलेली बांधिलकी कायम ठेवत काम करणाऱ्या सुभाष जाधव यांच्या निवडीचे शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या दीर्घकाळाच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

या निवडीबद्दल संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कर्जत तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव, जामखेड तालुकाप्रमुख ॲड. मयुर डोके-पाटील, उपतालुकाप्रमुख विलास रेणुकर, अजित कानगुडे, राशीन शहरप्रमुख जितेंद्र शेटे, उपशहरप्रमुख संदीप राऊत, अमृत जंजिरे, साहिल शेख, ऋषिकेश परदेशी, अमोल दळवी, सागर पगी, बाळासाहेब शेटे, सुनील काका दडगळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व मित्रपरिवाराने सुभाष जाधव यांचे अभिनंदन केले.

 

“निष्ठेला संघटनात्मक जबाबदारीची साथ मिळाली असून, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू,” अशी भावना सुभाष जाधव यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली.

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!