राशीनमध्ये ओम् प्रतिष्ठान शिवभक्त मित्र मंडळातर्फे गणरायाची भक्तिभावाने आरती

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी). : राशीन शहरातील वॉर्ड क्रमांक ६ येथील मेघराज गिफ्ट हाऊस येथे ओम् प्रतिष्ठान, शिवभक्त मित्र मंडळाच्या वतीने गणरायाची भक्तिभावाने आरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे-पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राशीन शहराध्यक्ष दीपक जंजिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ॲड. बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. भक्तिमय वातावरणात झालेल्या आरतीला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरतीपूर्वी ॲड. बाळासाहेब शिंदे-पाटील व दीपक जंजिरे यांचा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन संस्थापक अध्यक्ष पै. पृथ्वीराज अजित मोढळे यांनी सत्कार करण्यात आला. गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
ओम् प्रतिष्ठान, शिवभक्त मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पै. पृथ्वीराज अजित मोढळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उपक्रम पार पडला.
यावेळी नरेश घोडके, प्रेम गायकवाड, अजिंक्य कांबळे, रणवीर सुरवसे, बुधभूषण कांबळे, शिवराज मोढळे, जहीर शेख, अखिल काळे, अनिकेत पवळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

















