spot_img
spot_img
spot_img

घोगरगावातील गटारकामाची चौकशी करा; बिल अदा न करण्याची मागणी! सागर शेळके यांचा NHAI ला निवेदनाद्वारे इशारा; मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास २९ ऑक्टोबरला आमरण उपोषण

घोगरगावातील गटारकामाची चौकशी करा; बिल अदा न करण्याची मागणी!

 

सागर शेळके यांचा NHAI ला निवेदनाद्वारे इशारा; मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास २९ ऑक्टोबरला आमरण उपोषण

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : मौजे घोगरगाव, ता. श्रीगोंदा येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अंतर्गत सुरू असलेल्या महामार्गालगतच्या गटारकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे श्रीगोंदा तालुका संघटक सागर दयानंद शेळके यांनी १२ ऑक्टोबर रोजी NHAI च्या अहिल्यानगर येथील प्रकल्प संचालकांना निवेदन देऊन कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

गटारकामातील वापरलेले साहित्य, लांबी-रुंदी, खोली, बांधकामाची जाडी, कामगारांची सुरक्षा आणि वाहनचालकांसाठी आवश्यक उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी करावी. तसेच मंजूर अंदाजपत्रक, कार्यादेश, निविदेतील अटी, मोजमाप पुस्तिका, गुणवत्ता तपासणी अहवाल आणि कंत्राटदाराच्या बिलांचा तपशील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

कामाची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष मोजमापांची खातरजमा करून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होईपर्यंत प्रलंबित बिल अदा करू नये, अशी भूमिका शेळके यांनी मांडली आहे. गटारकामामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांना व मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या आहेत का, याची माहितीही मागण्यात आली आहे.

 

निवेदनाची दखल घेऊन तातडीने चौकशी व कार्यवाही न झाल्यास २९ ऑक्टोबर २०२६ रोजी NHAI च्या अहिल्यानगर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा सागर शेळके यांनी दिला आहे. दरम्यान, कामातील त्रुटी किंवा अनियमितता अधिकृत तपासणीत अद्याप सिद्ध झालेली नसून, प्राधिकरणाची भूमिका समोर येणे बाकी आहे.

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!