spot_img
spot_img
spot_img

राशीनमध्ये नवरात्रोत्सवात व्यावसायिकांकडून सक्तीची वसुली? दमदाटी केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा! खासगी जागेत कमिटी वसुलीचा अधिकार कोणाला? ग्रामपंचायतीचा ठराव जाहीर करा; रवींद्र दामोदर यांचे व्यावसायिकांना निर्भीडपणे तक्रार करण्याचे आवाहन!

राशीनमध्ये नवरात्रोत्सवात व्यावसायिकांकडून सक्तीची वसुली? दमदाटी केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा!

खासगी जागेत कमिटी वसुलीचा  ग्रामपंचायतच्या कमिटी धारकाला अधिकार कोणी दिला व कोणाच्या सांगण्यावरून कमिटी गोळा करात आहे ? ग्रामपंचायतीचा ठराव जाहीर करा; रवींद्र दामोदर यांचे व्यावसायिकांना निर्भीडपणे तक्रार करण्याचे आवाहन!

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :                         श्री जगदंबा देवी शारदीय नवरात्रोत्सवासाठी बाहेरगावाहून पोटापाण्यासाठी येणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडून कमिटीच्या नावाखाली सक्तीने पैसे मागितले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तुकाराम दामोदर यांनी केली आहे. खासगी मालकीच्या जागेत दुकान लावणाऱ्या व्यावसायिकांकडून वसुली कशाच्या आधारावर केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

“आज दहा रुपये दिले, उद्यापासून शंभर रुपये द्यावे लागतील,” अशी भाषा वापरली जात असल्याचा आरोप करत, संबंधित कमिटीधारकांकडे अधिकृत ओळखपत्र नसल्यास त्यांच्या वसुलीच्या अधिकाराची पडताळणी करावी, अशी मागणी दामोदर यांनी केली आहे. मागील वर्षी तसेच यंदाही नवरात्रोत्सवात कमिटी गोळा न करण्याबाबत ठराव झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात वसुली का केली जात आहे, याचा खुलासा ग्रामपंचायतीने करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव, ठरलेली रक्कम, वसुलीचा हिशेब आणि जमा झालेल्या उत्पन्नाची सखोल चौकशी करून संबंधित तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खासगी जागेतील व्यावसायिकांकडून शुल्क मागण्याचा अधिकार आहे का, याबाबत अधिकृत कागदपत्रे व नियम तपासूनच कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

दमदाटी, धमकी किंवा व्यावसायिकांचे साहित्य उचलून नेण्याचा प्रयत्न झाल्यास घाबरू नका! अशा प्रकाराला बळी न पडता संबंधित व्यावसायिकांनी आपल्याशी संपर्क मोबाईल वर 94222 81556 साधावा, असे आवाहन दामोदर यांनी केले आहे. तक्रारीची सत्यता तपासून दोषींविरुद्ध कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

आता ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित ठराव आणि वसुलीबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!