spot_img
spot_img
spot_img

राशीनमध्ये कमिटीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुलीचा आरोप; वार्ताहराला जीवे मारण्याची धमकी! ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा दावा करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींची ओळख उघड करण्याची मागणी; लिलाव, ठराव आणि वसुलीच्या हिशेबाची चौकशी करून फौजदारी कारवाई करा – ऋषभ परदेशी

राशीनमध्ये कमिटीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुलीचा आरोप; वार्ताहराला जीवे मारण्याची धमकी!

 

ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा दावा करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींची ओळख उघड करण्याची मागणी; लिलाव, ठराव आणि वसुलीच्या हिशेबाची चौकशी करून फौजदारी कारवाई करा – ऋषभ परदेशी

 

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री जगदंबा देवी, राशीन येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान कमिटीच्या नावाखाली पैसे गोळा करण्यावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीचे कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींनी अंगावर गणवेश व ओळखपत्र नसताना पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ओळख विचारली असता नाव सांगण्यास टाळाटाळ करण्यात आली. यावेळी वार्ताहर म्हणून विचारणा करणाऱ्या ऋषभ परदेशी यांना जीवे मारण्याची धमकी  दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

 

🔴 कमिटीचा ठराव कुठे? लिलाव किती रुपयांना झाला?

 

संबंधित कमिटीची अधिकृत नियुक्ती झाली आहे का? ग्रामपंचायतीने याबाबत ठराव मंजूर केला आहे का? सन २०२६ साठी कमिटीचा कायदेशीर लिलाव झाला आहे का? झाला असल्यास लिलावाची रक्कम किती, वसुलीचे अधिकृत अधिकार कोणाला आणि नागरिकांकडून किती रक्कम गोळा करण्याची परवानगी आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत.

 

संबंधित व्यक्तींकडे वसुलीचा अधिकृत आदेश, लिलावाची कागदपत्रे किंवा नियमावली दाखविण्याची मागणी केली असता ती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे ही वसुली अधिकृत आहे की अनधिकृत, याची ग्रामपंचायतीने कागदपत्रांच्या आधारे स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.

 

🔴 ग्रामसेवक रोहिदास कापरे यांनी खुलासा करावा!

 

ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रोहिदास कापरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामस्थांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ऋषभ परदेशी यांनी केली आहे.

 

कमिटी गोळा करण्यासाठी अधिकृत ठराव झाला असल्यास त्याची प्रत, लिलाव प्रक्रिया व रकमेचा तपशील, वसुलीचे नियम, संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अधिकृत पावतीपुस्तके आणि जमा झालेल्या पैशांचा हिशेब प्रसारमाध्यमांसमोर सादर करावा. तसेच ग्रामपंचायतीच्या नावाचा वापर करून कोणी अनधिकृतपणे पैसे गोळा करत आहे का, याची चौकशी करावी.

 

🔴 सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्डिंग आणि लोकेशनची चौकशी करा!

 

पैसे गोळा करणाऱ्या दोन्ही अज्ञात व्यक्तींची ओळख व कोणाला याचा आर्थिक लाभ काही अधिकारी किंवा काही पुढारी कोणाचे हितंबध आर्थिक लागेबांधे आहेत का याची ही चौकशी झाली पाहिजे तातडीने पटवावी. संबंधित ठिकाणचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, घटनेशी संबंधित कॉल रेकॉर्डिंग, कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक कॉल तपशील व लोकेशनची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुरावे उपलब्ध असल्यास ते जतन करून सक्षम तपास यंत्रणेकडे द्यावेत, असेही तक्रारदाराने म्हटले आहे.

 

धमकी देणे आणि अधिकृत अधिकार नसताना पैशांची मागणी करणे याबाबत तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून, तथ्ये व पुरावे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध खंडणी, धमकी किंवा इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

🔴 कलेक्टर आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा इशारा

 

या प्रकरणातील सर्व उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत आदेश, वसुलीचा हिशेब आणि संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीची माहिती तक्रारदार म्हणून आपल्याला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ऋषभ परदेशी यांनी केली आहे. प्राप्त पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

🔴 पत्रकाराला धमकी म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला?

 

पत्रकार हा समाजातील अन्याय, अनियमितता आणि गैरप्रकार जनतेसमोर आणणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर जाब विचारणाऱ्या वार्ताहराला धमकावण्याचा प्रकार खरोखर घडला असल्यास तो अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेचा आवाज दडपण्यासाठी दहशत किंवा दादागिरीचा वापर सहन केला जाऊ नये.

 

राशीन ग्रामपंचायत या प्रकरणावर अधिकृत खुलासा करणार का? कमिटीची वसुली कायदेशीर असल्याचे पुरावे जनतेसमोर येणार का? आणि वार्ताहराला धमकी दिल्याच्या आरोपाची पोलीस चौकशी होणार का? या प्रश्नांची उत्तरे आता ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित तपास यंत्रणांनी द्यावीत, अशी मागणी होत आहे.

कोणी छोट्यामोठ्या व्यायसाईकाना राशीन श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये दमदाटी खंडणी वसुली करत असेल तर संपर्क करा 9595090993 त्या व्यक्तीवर तत्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करू आणि संबंधित व्यक्तीला न्याय मिळवून देऊ

— ऋषभ परदेशी

वार्ताहर, दैनिक राष्ट्र सह्याद्री

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!