*घोगरगाव येथे बाप्पा चरणी पावसासाठी साकडे; महाराष्ट्रात पाऊस पडू दे म्हणून जानाई युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाची प्रार्थना*

*घोगरगाव, ता.श्रींगोदा (प्रतिनिधी) -*. महाराष्ट्रावर सध्या पावसाच्या खंडाचे सावट आहे. अनेक ठिकाणी पिके माना टाकू लागली आहेत, शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत घोगरगाव येथील कुंभार व बेरड वस्ती येथील जानाई युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाने गणपती बाप्पा चरणी एकच मागणी घातली आहे – “बाप्पा, महाराष्ट्रात पाऊस पडू दे.”
यंदा मंडळाने कोणतीही मोठी सजावट किंवा डीजे न लावता, अत्यंत साध्या पद्धतीने पावसासाठी प्रार्थना केली
त्यामुळे आम्ही बाप्पाकडे एकच मागणे मागितले आहे – “पाऊस पडला पाहिजे.”
*सरपंचांच्या उपस्थितीत सामूहिक प्रार्थना -*
काल रात्री आरतीच्या वेळी आदर्श सरपंच सौ. सुजाता मिलिंद भोसले, मिलिंद भोसले साहेब, शिंदे साहेब अक्षय बेरड निलेश बेरड करण बेरड सोहम बेरड शुभम बेरड प्रथमेश शिंदे आणि कुंभार व बेरड वस्तीतील सर्व महिला, पुरुष, लहान मुले यांनी एकत्र येऊन बाप्पाकडे पावसासाठी साकडे घातले.
सरपंच सुजाता भोसले म्हणाल्या, “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण पाणी नाही तर पीक नाही. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, तो महाराष्ट्रावरचे हे पावसाचे विघ्न नक्की दूर करेल. आमच्या घोगरगावसह संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडावा म्हणून आम्ही प्रार्थना केली.”
यावेळी महिलांनीही – “आमच्या मका, सोयाबीन, कापूस वाचला पाहिजे, पोराबाळांच्या तोंडचा घास राहिला पाहिजे, म्हणून बाप्पाकडे पाऊस मागितला” असे सांगितले.
जानाई युवा प्रतिष्ठानने यंदा सामाजिक संदेशही दिला आहे. मंडपात “पाणी अडवा, पाणी जिरवा” आणि “झाडे लावा, पाऊस मिळवा” असे फलक लावले आहेत. विसर्जनाच्या दिवशी वृक्षारोपण करण्याचा संकल्पही मंडळाने केला आहे.
सध्या रोज संध्याकाळी आरतीनंतर 5 मिनिटे सर्व ग्रामस्थ मिळून “महाराष्ट्रात पाऊस पडू दे” म्हणून सामूहिक प्रार्थना करत आहेत. या भक्तीमय प्रार्थनेमुळे कुंभार व बेरड वस्तीमध्ये एक वेगळेच चैतन्य आले आहे.
खरंच, जिथे प्रशासनाच्या पाहण्या सुरु आहेत, तिथे आता शेतकऱ्यांची शेवटची आशा विघ्नहर्त्या बाप्पावर आहे. बाप्पा नक्कीच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे गाऱ्हाणे ऐकून पाऊस पाडेल, असा विश्वास जानाई युवा प्रतिष्ठान गणेश मंडळ, कुंभार व बेरड वस्ती, घोगरगाव येथील सर्व भाविकांनी व्यक्त केला आहे.
*गणपती बाप्पा मोरया, पाऊस पाड, महाराष्ट्र जगव!*

















