spot_img
spot_img
spot_img

* चांद े खुर्द येथ े वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू: वनविभागाकडून शवविच्छेदन व दहन *

📰 *चांदे खुर्द येथे वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; वनविभागाकडून शवविच्छेदन व दहन*

 

प्रतिनिधी श्रीगोंदा…सागर शेळके

माळढोक पक्षी अभयारण्यांतर्गत मिरजगाव वनपरिक्षेत्रातील मौजे चांदे खुर्द येथील गट क्रमांक ११७ मध्ये रस्त्यावर वाहनाची धडक लागून तरस या वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रस्त्यावर तरस मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी तरस मृतावस्थेत आढळून आल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मृत तरसाचा ताबा घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असता घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान तरसाच्या तोंडाच्या व डोक्याच्या भागावर जखम व रक्तस्राव झाल्याचे दिसून आले होते. तसेच, त्याच्या उजव्या मागील मांडीच्या भागातील हाड तुटलेले आढळून आले. सदर घटना वाहनाच्या धडकेमुळे घडली असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट करण्यासाठी कर्जत येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तरसाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

शवविच्छेदनाच्या कार्यवाहीदरम्यान दादा पाटील महाविद्यालयातील बी.एस्सी. (Zoology) विषयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापिका यांना तरसाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी, कर्जत यांच्या सहकार्याने तरसाच्या बाह्य व अंतर्गत प्रमुख अवयवांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आली होती. वन्यप्राण्याची शरीररचना, प्रमुख अवयव, जखमांचे निरीक्षण आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती देण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वन्यजीवशास्त्र विषयाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळाली. वन्यप्राण्यांची ओळख, शरीररचना आणि वन्यजीव संरक्षणाच्या कार्यपद्धतीची माहिती प्रत्यक्ष निरीक्षणातून समजून घेण्यास मदत झाली.

 

शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या सूचना व विहित कार्यपद्धतीनुसार मृत तरसाचे दहन करण्यात आले आहे. रेहेकुरी अभयारण्याच्या परिसरात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंच आणि साक्षीदार यांच्या उपस्थितीत दहनाची कार्यवाही केली आहे.

 

 

दरम्यान, तरसाचा मृत्यू हा अपघाती वाहनधडकेमुळे झाला होता की कोणीतरी व्यक्तीने हेतुपुरस्सर वाहनाची धडक देऊन त्याचा मृत्यू घडवून आणला होता, याबाबत वनविभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात आवश्यक नोटीस जारी करून संबंधित वाहन व वाहनचालकाचा शोध घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

 

घटनास्थळाची पाहणी, स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलन आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी करून घटनेचे नेमके कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येत आहे. तपासातून प्राप्त होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

 

वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहावे. रस्त्यावर मृत किंवा जखमी वन्यप्राणी आढळल्यास त्यास हाताळण्याऐवजी तातडीने वनविभागास माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!