spot_img
spot_img
spot_img

सिना धरण मुरूम माती घोटाळा : घोगरगावातील कोट्यवधीच्या मुरूम चोरीवर पडदा टाकण्यासाठी बनावट FIR चा बनाव, अर्जदाराची दिशाभूल करण्याचे पाटबंधारे खात्याच े षडयंत्र उघड – आता विहीर खोदणाऱ्यांना वाचवण्यासाठी पुन्हा सक्रिय *

*सिना धरण मुरूम-माती घोटाळा : घोगरगावातील कोट्यवधीच्या मुरूम चोरीवर पडदा टाकण्यासाठी बनावट FIR चा बनाव; अर्जदाराची दिशाभूल करण्याचे पाटबंधारे खात्याचे षडयंत्र उघड – आता विहीर खोदणाऱ्यांना वाचवण्यासाठी पुन्हा सक्रिय*

प्रतिनिधी श्रीगोंदा … सागर शेळके

*थिटे सांगवी/घोगरगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) -* सिना पाटबंधारे उपविभाग मिरजगावच्या भ्रष्ट कारभाराचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मौजे घोगरगाव येथे पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील कोट्यवधी रुपयांचा मुरूम बेकायदेशीरपणे चोरीला गेला. या प्रकरणात तक्रारदार शेतकऱ्याने (नाव गुप्त) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर, केवळ त्याचे समाधान करण्यासाठी आणि त्याची दिशाभूल करण्यासाठी पाटबंधारे खात्याने एक फार्सिकल, दिशाभूल करणारी फिर्याद दाखल केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे.

आणि याच पद्धतीने आता सिना धरणाच्या पोटात बेकायदेशीर विहिरी खोदणाऱ्या राजकीय बगलबच्चांना वाचवण्यासाठी पाटबंधारे खात्याचा मोठा पुढाकार दिसून येत आहे. मागील प्रकरणांमध्येही पाटबंधारे खात्याने अर्जदाराची दिशाभूल करण्याचे मोठे षडयंत्र रचले होते, पण जागरूक अर्जदाराने ते हाणून पाडले. आता प्रश्न एकच आहे, विहीर खोदण्यावर काय गुन्हा दाखल करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

*घोगरगाव मुरूम चोरी प्रकरण – कोट्यवधीचा घोटाळा कसा दाबला?

 

कोट्यवधीचा मुरूम चोरी:* घोगरगाव येथे पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जमिनीतून, धरणाच्या भरावासाठी आणलेला आणि साठा करून ठेवलेला लाखो ब्रास मुरूम रातोरात JCB, आणि ट्रॅक्टर साहाय्याने चोरीला गेला. याची अर्जदार यांच्या पुरावे आहेत किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

 

आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतरच जाग आली:* या मुरूम चोरीवर अर्जदाराने वारंवार तक्रारी करूनही पाटबंधारे खाते झोपले होते. जेव्हा अर्जदाराने जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा लेखी इशारा दिला, तेव्हाच कुठे खात्याला जाग आली.

 

दिशाभूल करणारी FIR:* अर्जदाराचे तोंड बंद करण्यासाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना “आम्ही कारवाई केली” असे दाखवण्यासाठी, पाटबंधारे खात्याने अत्यंत तकलादू आणि दिशाभूल करणारी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत खरी चोरीची व्याप्ती, खरी किंमत, खरे आरोपी यांची नावे जाणीवपूर्वक टाळण्यात आली.

पाटबंधारे खाते यांना पेन ड्राइव मध्ये पुरावे देऊनही मूळ आरोपी अज्ञात

मूळ आरोपींना वगळले:* FIR मध्ये फक्तं अज्ञात दिला

 

पंचनामाच नाही:* कोट्यवधीच्या मुरूम चोरीचा कोणताही शास्त्रोक्त पंचनामा, महसूल विभागामार्फत मोजमाप, रॉयल्टीचा हिशेब याशिवायच घाईघाईत FIR दाखल करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न झाला.

 

हेच षडयंत्र आता विहीर प्रकरणात:* याच पद्धतीचा कित्ता आता थिटे सांगवी येथील सिना धरणातील बेकायदेशीर विहिरींच्या प्रकरणात गिरवला जात आहे. चार महिने अर्ज करूनही कारवाई नाही, म्हणजे घोगरगाव पॅटर्नचीच पुनरावृत्ती.

 

राजकीय बगलबच्चा कनेक्शन:* घोगरगाव मुरूम चोरी आणि थिटे सांगवी विहीर खोदकाम या दोन्ही प्रकरणातील सूत्रधार एकाच आहे काय असं मांडवगण गटामध्ये चर्चा आहे राजकीय नेत्याचे बगलबच्चे असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. हॉटेल व्यावसायिक दोन्ही ठिकाणी गुंतला आहे.

पाटबंधारे खात्याचा डबल रोल:* एकीकडे स्वतःच्या हद्दीतील मुरूम चोरीला जाऊ देणे, आणि दुसरीकडे त्यावर कारवाई केल्याचा बनाव करणे, हा पाटबंधारे खात्याचा डबल रोल आता उघड झाला आहे.

 

अर्जदाराने षडयंत्र हाणून पाडले:* घोगरगाव प्रकरणात अर्जदार हुशार निघाला. त्याने ती दिशाभूल करणारी FIR स्वीकारली नाही. त्याने थेट जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता पुणे यांच्याकडे “ही बनावट कारवाई आहे, खरी कारवाई करा” असा प्रतिअर्ज दाखल केला.

 

विहिरींसाठीही तसेच होणार का?:* आता सवाल आहे की, विहीर खोदण्याच्या प्रकरणातही पाटबंधारे खाते अशीच एखादी तकलादू नोटीस देऊन, किरकोळ दंड करून, विहीर आहे तशीच ठेवून प्रकरण मिटवणार का? यावर अर्जदाराचे लक्ष आहे.

कायद्याचा स्पष्ट भंग:* महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम कलम 30 आणि 31 नुसार धरणाच्या निळ्या पुर रेषेच्या आत कोणतेही खोदकाम करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यासाठी 2 वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे. तरीही गुन्हा दाखल का नाही?

 

पर्यावरणाचा मुद्दा:* सिना धरणाच्या हद्दीतील मुरूम आणि माती काढल्याने धरणाच्या जलधारण क्षमतेवर परिणाम होतो. पर्यावरण विभागाची परवानगी घेतलेली नाही.

महसूल बुडवला:* या मुरूम आणि माती चोरीवर शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवण्यात आली आहे. याला जबाबदार कोण?

 

सिना पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप:* या सर्व प्रकारामुळे अहिल्यानगर जिल्हा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पाटबंधारे खाते हे शेतकऱ्यांसाठी आहे की माफियांसाठी, असा सवाल ते विचारत आहेत.

या प्रकरणांमध्ये अर्जदाराला साक्षीदार म्हणून घेणार

अर्जदाराने आता स्पष्ट केले आहे की, तो यापुढे पाटबंधारे खात्याच्या कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या कागदाला बळी पडणार नाही. विहीर प्रकरणात जर 7 दिवसात विहीर बुजवून, संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही, अर्जदार जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार आहे

घोगरगाव येथील कोट्यवधीच्या मुरूम चोरीवर दिशाभूल करणारी FIR दाखल करून पाटबंधारे खात्याने स्वतःची पाठ थोपटून घेतली, पण खरे माफिया मोकाटच राहिले. त्याच माफियांनी आता सिना धरणाच्या पोटात विहिरी खोदल्या आहेत. जर या विहिरींवरही अशीच बनावटी कारवाई झाली, तर हे सिद्ध होईल की सिना पाटबंधारे उपविभाग मिरजगाव हा विभाग राहिला नसून, तो एका राजकीय नेत्याच्या बगलबच्चांचे संरक्षण करणारे खाजगी कार्यालय झाले आहे.

 

या प्रकरणात आता जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतः लक्ष घालून, घोगरगाव आणि थिटे सांगवी दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी करणे गरजेचे आहे. अन्यथा सिना धरणाच्या नावावर कोट्यवधीचा घोटाळा असाच सुरू राहील आणि एका प्रामाणिक शेतकऱ्याला घटस्थापनेच्या दिवशी उपोषणाला बसावे लागेल, याची सर्व जबाबदारी पाटबंधारे खात्यावर राहील.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!