spot_img
spot_img
spot_img

* कै. सुनिल (बंडू) रावसाहेब उगले – प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

*कै. सुनिल (बंडू) रावसाहेब उगले – प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली*

प्रतिनिधी श्रीगोंदा….सागर शेळके

थिटे-सांगवी, ता. श्रीगोंदा येथील दिलदार, मनमिळाऊ आणि हसतमुख व्यक्तिमत्व कै. सुनिल (बंडू) रावसाहेब उगले यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दि. 24/09/2026 रोजी सकाळी 10.00 वा. होत आहे.

 

“तुमचं असणं सर्वकाही होतं, एक सुंदर पर्व होतं, पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे” ही ओळ त्यांच्या जीवनाची खरी ओळख आहे.

 

बंडू म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक दिलदार माणूस. गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आपलंसं करणारा, अडचणीत धावून येणारा आणि चेहऱ्यावर कायम हसू ठेवणारा आमचा बंडू काळाच्या पडद्याआड गेला, यावर अजूनही विश्वास बसत नाही.

कुटुंबासाठी ते आधारवड होते. वडील श्री. रावसाहेब तुकाराम उगले, आई सौ. गयाबाई, पत्नी राधा, भाऊ अनिल, भावजई सपना, मुलगी स्नेहल, मुलगा युवराज, बहीण आशाबाई खराडे, दाजी संदिप खराडे यांच्यासह संपूर्ण परिवाराला पोरकं करून ते गेले. त्यांची उणीव घराच्या उंबऱ्यापासून शेताच्या बांधापर्यंत प्रत्येक ठिकाणी जाणवते.

 

त्यांनी कधी कोणाचे मन दुखावले नाही, तर सर्वांना मदतच केली. त्यांचा साधेपणा हाच त्यांचा मोठेपणा होता.

 

या पुण्यस्मरणानिमित्त थिटे-सांगवी येथे ह.भ.प. सोमनाथ महाराज मेटे यांचे प्रवचन आयोजित केले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

कै. सुनिल (बंडू) उगले यांच्या आठवणी सदैव आमच्या हृदयात राहतील.

 

*समस्त उगले परिवार व ग्रामस्थ थिटे-सांगवी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!*

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!