राशीनमध्ये ‘आईसाहेब ॲग्रो इंडस्ट्रीज’च्या शाखा क्र. १चा भव्य शुभारंभ
धान्य खरेदी-विक्रीसह नैसर्गिक कोल्ड प्रेस ऑइल केंद्राची सुरुवात; शेतकरी, व्यापारी व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती
राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :
आई जगदंबेच्या पावन भूमीत वसलेल्या राशीन शहरात आईसाहेब ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित ‘आईसाहेब ॲग्रो इंडस्ट्रीज’ शाखा क्र. १ या धान्य व नैसर्गिक कोल्ड प्रेस ऑइल खरेदी-विक्री केंद्राचा भव्य शुभारंभ आज सकाळी ११ वाजता उत्साही व मंगलमय वातावरणात पार पडला.
भगवान श्री बलराम जयंतीचे औचित्य साधून या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भगवान श्री बलराम तसेच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून देशातील शेतकरी सुखी, समाधानी व समृद्ध व्हावा, शेतीला चांगले दिवस यावेत आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य बाजारपेठ मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शुद्ध व नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य
बदलत्या जीवनशैलीत शुद्ध, दर्जेदार व नैसर्गिक अन्नपदार्थांना वाढती मागणी आहे. ही गरज लक्षात घेऊन राशीन परिसरातील नागरिकांना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले कोल्ड प्रेस शेंगदाणा तेल, करडी तेल व सूर्यफूल तेल, तसेच आधुनिक क्लिनिंग व ग्रेडिंग युनिटद्वारे स्वच्छ व दर्जेदार केलेले गहू, ज्वारी व बाजरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटन सोहळ्यास शासकीय अधिकारी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, शिक्षक, शेतकरी व प्रगतशील बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ‘स्मार्ट आत्मा’चे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी राजू रोरे, कर्जत तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, कृषी कार्यालयातील पाटील साहेब, पुण्याचे उद्योजक विष्णू शेठ चौधरी, बापूसाहेब होले, युवक नेते राजेंद्रभैया देशमुख, राहुल राजे भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील नामदेव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कृषी व शेतकरी क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले कर्जत तालुका फार्मर कंपनीचे चेअरमन शरद अण्णा मेहेत्रे तसेच कर्जत विलॲग्रो ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन उमेश शिंदे (चिलवडी) यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
स्थानिक मान्यवरांसह व्यापारी वर्गाचा सहभाग
राशीनच्या माजी सरपंच सौ. नीलमताई भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य अतुलजी साळवे, तसेच दीपक थोरात, नाजीम काजी, सागर मोढळे, तात्यासाहेब माने, सुभाष जाधव, अंबादास तात्या जाधव, अमोल माने, सचिन साळवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सोहळ्यास व्यापारी वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. अमोल शेठ झगडे, राहुल शेठ जांभळकर, राजू शेठ राऊत, गुलाब शेठ धोंडे, केशर काका मंडलेचा, राहुल शेठ मंडलेचा, परिश शेठ अच्छा यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती
शिक्षण क्षेत्रातून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वावगे सर, नेवसे सर, आशाबाई हनुमंत ढोबे, सतीश गुंड, नाथा चौगुले यांच्यासह जिल्हा परिषद शाळा व जगदंबा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
बळीराजाकडून नव्या उपक्रमाचे स्वागत
आईसाहेब ॲग्रो इंडस्ट्रीजच्या या उपक्रमाला परिसरातील शेतकरी व प्रगतशील बागायतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी समिंदर देविदास काळे, पोपट अर्जुन काळे, रविंद्र दिगंबर काळे, केशवराव लाहोर, सर्जेराव सोनबा काळे, गणेश गोकुळ लाहोर, रामा अंकुश लाहोर, शत्रुघ्न ज्ञानदेव लाहोर, रूपचंद केरबा माहिते, तात्यासाहेब मारुती मोरे, यशवंत ज्ञानदेव काळे, हरिश्चंद्र महादेव काळे यांच्यासह अनेक प्रगतशील बागायतदार उपस्थित होते.
तसेच निवृत्ती जनार्दन भांडवलकर, शिवाजी भोसले, रामचंद्र भोसले (शिंपोरा) यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून कंपनीच्या उपक्रमाचे स्वागत केले.
शेतकरी व ग्राहकांसाठी महत्त्वाचा दुवा
कार्यक्रमास कंपनीचे संचालक मंडळ, शेतकरी सभासद, महिला सभासद, मित्रपरिवार तसेच राशीन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्राहकांना स्वच्छ व दर्जेदार धान्य उपलब्ध करून देणे आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या कोल्ड प्रेस तेलाचा पर्याय उपलब्ध करून देणे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आईसाहेब ॲग्रो इंडस्ट्रीजचा हा उपक्रम शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
भविष्यात शेतकरी आणि ग्राहकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन कंपनीकडून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राशीनकरांना दर्जेदार धान्य आणि नैसर्गिक कोल्ड प्रेस तेलाची उपलब्धता एकाच छताखाली होणार असल्याने या नव्या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.

















