कर्जत शहरात युवासेनेचा संघटनात्मक विस्तार; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांत उत्साह

युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवासेना सज्ज; शहरासह तालुक्यात संघटन मजबूत करण्याचा निर्धार
राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :
कर्जत शहरात शिवसेना युवासेनेच्या संघटनात्मक विस्ताराला आता अधिक वेग मिळणार असून, विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. युवकांना संघटित करत शहरातील तसेच तालुक्यातील युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवर आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
युवासेनेच्या माध्यमातून युवकांना संघटनेशी जोडून त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्याने कर्जत शहरातील संघटनात्मक बांधणीला नवी चालना मिळाली आहे. नवनियुक्त पदाधिकारी आगामी काळात युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील आणि पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करतील, असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रज्वल भोज यांची युवासेना उपशहरप्रमुखपदी, आदित्य चिंचकर यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी, प्रणव माने यांची शिवसेना विद्यार्थी आघाडी शहरप्रमुखपदी, वैभव शिंदे यांची युवासेना संघटक कर्जत शहरप्रमुखपदी, तर जयेश सोनवणे यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे कर्जत शहर व तालुक्यात युवासेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून, युवकांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी संघटना अधिक सक्रिय होईल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेक राजे भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल, युवासेना तालुकाप्रमुख माधव जठार, युवासेना शहरप्रमुख अमित माने, विशाल माने, सुदाम गदादे, सावता अनारसे, शुभम अनारसे, प्रणय गव्हाणे आणि हर्षद तिवारी यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

















