spot_img
spot_img
spot_img

शासकीय गटावर अतिक्रमणाचा डाव? हिंगणी दुमाला ग्रामपंचायतीचा तहसीलदारांना थेट इशारा!

शासकीय गटावर अतिक्रमणाचा डाव? हिंगणी दुमाला ग्रामपंचायतीचा तहसीलदारांना थेट इशारा!

 

गट नं. २ मधील अतिक्रमण व जागेच्या अनधिकृत विक्रीच्या तक्रारीने खळबळ; बांधकाम तत्काळ थांबवून संबंधितांवर कारवाईची मागणी

 

श्रीगोंदा | प्रतिनिधी सागर शेळके:

Oplus_16908288

हिंगणी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील शासकीय मालकीच्या गट नं. २ मधील अतिक्रमण आणि जागेच्या कथित अनधिकृत विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीने थेट श्रीगोंदा तहसीलदारांकडे पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार, गट नं. २ हा शासकीय मालकीचा असून या ठिकाणी गावातील काही ग्रामस्थांची पूर्वीपासून घरे व बांधकामे अतिक्रमणाच्या स्वरूपात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या या शासकीय जागेवर बाहेरील गावातील व्यक्तींकडून घरांचे अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याची तक्रार ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे.

 

इतकेच नव्हे तर शासकीय गटातील जागांची अनधिकृत विक्री झाल्याबाबतही तक्रार प्राप्त झाल्याचे ग्रामपंचायतीने तहसीलदारांना कळविले आहे. त्यामुळे शासकीय जमिनीवर नेमके कोणाच्या परवानगीने बांधकाम सुरू आहे? जागेची कथित विक्री कोणत्या आधारावर करण्यात आली? याची महसूल प्रशासनाकडून चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

ग्रामपंचायतीने आपल्या पत्रातून सदर अतिक्रमण तात्काळ थांबवावे तसेच अनधिकृतरीत्या बांधकाम करणाऱ्या अथवा शासकीय जागेच्या व्यवहारात सहभागी असल्याचे आढळणाऱ्या संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे.

 

शासकीय जमिनीवर ‘मनमानी’ला लगाम कधी?

 

शासकीय मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असून, महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून गट नं. २ ची हद्द, विद्यमान बांधकामे, नवीन बांधकामे आणि कथित जागा व्यवहारांची वस्तुस्थिती तपासणे अपेक्षित आहे. चौकशीत अनधिकृतता आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

ग्रामपंचायतीच्या या पत्रामुळे आता श्रीगोंदा महसूल प्रशासन काय भूमिका घेते आणि गट नं. २ मधील अतिक्रमणाबाबत कोणती कारवाई होते, याकडे हिंगणी दुमाला ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

ग्रामपंचायतीचा स्पष्ट इशारा — शासकीय जागेवर अतिक्रमण अथवा अनधिकृत व्यवहाराला आळा घालण्यासाठी तातडीने महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करावा!

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!