spot_img
spot_img
spot_img

श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे गावात श्रीदुर्गामाता दौडीचा जयघोष! भगव्या ध्वजासह युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर

श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे गावात श्रीदुर्गामाता दौडीचा जयघोष!

भगव्या ध्वजासह युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर

 

बांगर्डे | प्रतिनिधी सागर शेळके

 

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बांगर्डे गावात श्रीदुर्गामाता दौडीच्या माध्यमातून आदिशक्तीचा जागर करण्यात येत आहे. भगवे फेटे, पारंपरिक वेशभूषा आणि भगव्या ध्वजासह सहभागी झालेल्या युवकांच्या उत्साहातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडत आहे. या उपक्रमातून राजमाता जिजाऊंचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा वारसा आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचा संदेश दिला जात आहे.

जिजाऊंचे संस्कार, शिवरायांचा आदर्श!

 

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला त्याग आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. याच ऐतिहासिक वारशाचे स्मरण करून देणाऱ्या श्रीदुर्गामाता दौडीच्या माध्यमातून युवकांमध्ये शिस्त, एकजूट, भक्तिभाव आणि स्वाभिमानाची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

दुर्गामाता दौडीतून संस्कृतीचा जागर

नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा उत्सव आहे. या काळात देवी दुर्गेची आराधना करताना राजमाता जिजाऊंच्या कार्याचे स्मरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

 

बांगर्डे गावातील श्रीदुर्गामाता दौडीच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा, पारंपरिक वेशभूषा आणि भगव्या ध्वजाबद्दलची आस्था यांचे दर्शन घडत आहे.

 

शक्तीचा जागर, संस्कृतीचा अभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचा वारसा जपूया!

 

🚩 वेध श्रीदुर्गामाता दौडीचे!

🙏 जय भवानी! जय शिवराय!

 

संदर्भ : शिवप्रसाद शेळके धारकारी

बातमी : सागर शेळके |

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!