दुष्काळ निवारण आणि बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी राशीनमध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा!

श्री जगदंबा देवीच्या चरणी पर्जन्यवृष्टीसाठी प्रार्थना; १६ ऑक्टोबर रोजी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने धार्मिक सेवेचे आयोजन
राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) : शेतकरी बळीराजा सुखी व्हावा, राज्यातील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी होऊन शेती-शिवार हिरवेगार व्हावे, या मंगल संकल्पनेतून राशीन येथे श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा आयोजित करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र, दिंडोरी येथील परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार विविध ठिकाणी दुष्काळ निवारण व शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी धार्मिक सेवा आयोजित केली जात आहे.

याच उपक्रमांतर्गत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता श्री जगदंबा देवी मंदिर, राशीन येथे श्री स्वामी समर्थ केंद्र, राशीन सराफ मळा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा संपन्न होणार आहे.

या सेवेतून आई श्री जगदंबा देवीच्या चरणी प्रार्थना अर्पण करून शेतकरी बांधवांना सुख, समृद्धी लाभावी, पिकांना नवसंजीवनी देणारा समाधानकारक पाऊस पडावा आणि सर्वत्र सुख-शांती नांदावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे.
या धार्मिक सेवेसाठी राशीनसह कर्जत तालुका आणि परिसरातील तसेच भिगवण, बारामती, करमाळा, जामखेड, श्रीगोंदा, नगर व बीड परिसरातील सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधू-भगिनी आणि स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंदिर प्रवेशाबाबत सूचना : सेवेसाठी येणाऱ्या भाविकांना सकाळी ११ वाजल्यापासून मंदिराच्या दक्षिण बाजूच्या नवीन प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे.
आयोजक : श्री स्वामी समर्थ केंद्र, राशीन (सराफ मळा) व श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट, राशीन.
🙏🚩 श्री स्वामी समर्थ! जय आई जगदंबा! 🚩🙏

















