spot_img
spot_img
spot_img

शेतरस्त्यांना मिळणार डिजिटल दिशा; ‘महापाणंद ग्रिड मुळ े राज्यातील ४ लाख शेतरस्त्यांचे मॅपिंग

🚜 शेतरस्त्यांना मिळणार डिजिटल दिशा; ‘महापाणंद ग्रिड’मुळे राज्यातील ४ लाख शेतरस्त्यांचे मॅपिंग

Oplus_16908288

 

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’; ग्रामसभेतून रस्त्यांची निवड, मोफत सीमांकन व अतिक्रमणमुक्ती

 

राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी

 

राज्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत बारमाही आणि सुरक्षित संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना – शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ अभियानाचा १५ सप्टेंबर रोजी मंत्रालयात शुभारंभ करण्यात आला.

 

या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे ४ लाख शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यांचा समावेश Intelligent Works Management System (IWMS) मध्ये करण्यात आला असून, उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून रस्त्यांची स्थिती पाहता येणार आहे.

 

ग्रामसभेतून होणार रस्त्यांची निवड

 

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामसभांद्वारे शिवपानंद/शेतरस्त्यांची निवड केली जाणार असून, निवडलेल्या रस्त्यांचे मोफत सीमांकन तसेच आवश्यकतेनुसार अतिक्रमणमुक्तीची कार्यवाही केली जाणार आहे.

 

📱 फोटो आणि GPS लोकेशनसह तक्रार नोंदविता येणार

 

शेतकऱ्यांसाठी विशेष मोबाईल ॲपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतरस्त्यांशी संबंधित समस्या फोटो आणि GPS लोकेशनसह नोंदविता येणार आहेत.

 

शेतरस्ते विकसित झाल्यामुळे खते, बियाणे, कृषी यंत्रसामग्री तसेच इतर शेतीविषयक साहित्य शेतापर्यंत पोहोचवणे सुलभ होण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या अभियानाकडे पाहिले जात आहे.

 

प्रतिनिधी राशीन  : ऋषभ परदेशी

तेजमय भारत न्यूज

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!