spot_img
spot_img
spot_img

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!

 

नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

 

राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी)

Oplus_16908288

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारे नांदगाव येथील श्री रोकडेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव सायकर सर यांना राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल राशीन येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

शिवपार्वती विकास संस्था, राशीन संचलित न्यू इंग्लिश स्कूल, आखोणी संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार आंधळकर यांच्या शुभहस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी महादेव सायकर सर यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच त्यांच्यामध्ये शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी सायकर सर सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने नांदगावसह राशीन परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

सत्कारप्रसंगी डॉ. राजकुमार आंधळकर यांनी सायकर सर यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम आणि शिक्षण क्षेत्राप्रती असलेली निष्ठा यांचे प्रतीक म्हणजे हा पुरस्कार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूल, आखोणी येथील सहशिक्षक लालासाहेब शेलार, राशीन बीटचे कृषी अधिकारी भोसले साहेब, रामदास काळे, संतोष नष्टे यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन लालासाहेब शेलार आणि संतोष नष्टे यांनी केले.

 

महादेव सायकर सर यांच्या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे नांदगावच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली असून, त्यांच्या यशाचे परिसरातून स्वागत होत आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

संतपरंपरेचा वारसा जपणारे ह.भ.प. अॅड. अरुण महाराज पुंडे यांना ‘संत पायिक पुरस्कार’ प्रदान! संत साहित्य, हरिभक्ती आणि समाजप्रबोधनातील उल्लेखनीय योगदानाचा...

संतपरंपरेचा वारसा जपणारे ह.भ.प. अॅड. अरुण महाराज पुंडे यांना ‘संत पायिक पुरस्कार’ प्रदान!   संत साहित्य, हरिभक्ती आणि समाजप्रबोधनातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव; संतविचारांचा प्रसार करणाऱ्या कार्याचा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!