spot_img
spot_img
spot_img

Generali Central Life Insurance च्या नवीन कार्यालयाचा अहिल्यानगरमध्ये दिमाखात शुभारंभ ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता, विमा संरक्षण आणि आर्थिक साक्षरतेवर भर; कोहिनूर मॉलमध्ये अत्याधुनिक कार्यालय सुरू

Generali Central Life Insurance च्या नवीन कार्यालयाचा अहिल्यानगरमध्ये दिमाखात शुभारंभ

ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता, विमा संरक्षण आणि आर्थिक साक्षरतेवर भर; कोहिनूर मॉलमध्ये अत्याधुनिक कार्यालय सुरू

 

राशीन , दि. २४ ऑक्टोबर (प्रतिनिधी) ऋषभ परदेशी: Generali Central Life Insurance या विमा कंपनीच्या नवीन आणि अत्याधुनिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथील कोहिनूर मॉलच्या चौथ्या मजल्यावर मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन कार्यालयामुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासह कंपनीच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे.

 

या उद्घाटन सोहळ्यास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आलोक सर, तसेच वरिष्ठ अधिकारी पार्थ जिना, अजित डमाळ, गिरीश खांडवे, ज्ञानेश्वर पठारे, संदीप गागरे यांच्यासह कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी कंपनीच्या वतीने ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता आणि विमा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिकदृष्ट्या जागरूक करणे आणि सुरक्षित भविष्याच्या नियोजनासाठी मार्गदर्शन करणे, हे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

कंपनीच्या सीईओंनी ग्राहकांशी संवाद साधताना सांगितले की, नवीन कार्यालय हे कंपनीच्या प्रगतीच्या आणि विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. ग्राहकांना जलद, दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्याबरोबरच ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

“ग्राहकांना दिलेल्या आश्वासनांचे पालन करणे आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य नियोजनाला प्रोत्साहन देणे, याला आम्ही प्राधान्य देतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली छोटीशी गुंतवणूक भविष्यात मोठा आर्थिक आधार ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजून घेऊन आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे आवश्यक आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

तसेच, प्रत्येक ग्राहकासोबत मनमोकळा संवाद साधणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांचा सन्मान राखून सेवा देणे, ही कंपनीच्या कार्यपद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचेही सांगण्यात आले. आर्थिक नियोजन आणि विमा संरक्षणासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी कंपनीच्या कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

अहिल्यानगरमध्ये सुरू झालेल्या या नवीन कार्यालयामुळे ग्राहकांना विमा सेवा व आर्थिक नियोजनासंदर्भातील मार्गदर्शनासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून ग्राहकांशी अधिक जवळचे संबंध निर्माण करून भविष्यातील विस्ताराला चालना देण्याचा कंपनीचा मानस आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!