spot_img
spot_img
spot_img

तरडगव्हाण (ता. श्रीगोंदा) : ऊस तोडणीस सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

*तरडगव्हाण (ता. श्रीगोंदा) : ऊस तोडणीस सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

 

*तरडगव्हाण | प्रतिनिधी – सागर शेळके*

श्रीगोंदा तालुक्यातील तरडगव्हाण येथील शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीला आजपासून सुरुवात झाली आहे.

 

*सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा* फॅक्टरीच्या सन २०२६-२७ च्या *५२ व्या गळीत हंगामाचा* गव्हाणपूजन व गाळप शुभारंभ सोहळा सोमवार दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता संपन्न झाला.

या शुभारंभ सोहळ्यानंतर तालुक्यातील ऊस तोडणीला अधिकृतरित्या सुरुवात झाली असून, यामुळे तरडगव्हाण परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी या हंगामाची वाट पाहत होते. कारखान्याने वेळेत गाळप सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून ऊसाला योग्य भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

 

या हंगामामुळे ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम यांच्यामध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.

 

यावेळी कारखान्याचे चेअरमन *मा. श्री. राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे, व्हा. चेअरमन सौ. मेघाताई संदीप औटी* व सर्व संचालक मंडळ यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, हा ५२ वा गळीत हंगाम विक्रमी यशस्वी करू, असा विश्वास व्यक्त केला.

 

हा शुभारंभ *मा. सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पा. माजी अध्यक्षा जि.प. अहिल्यानगर व मा. सौ. अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे* यांच्या शुभहस्ते पार पडला.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!