spot_img
spot_img
spot_img

घोगरगावात NHAI च्या गटार कामावर सवाल; ‘साहेबांचा आदेश’ मात्र साहेब कोण? कामाचा दर्जा, मोजमाप, मंजूर आराखडा आणि अतिक्रमणांवरील कारवाईबाबत NHAI कडे स्पष्टीकरणाची मागणी

घोगरगावात NHAI च्या गटार कामावर सवाल; ‘साहेबांचा आदेश’ मात्र साहेब कोण?

 

कामाचा दर्जा, मोजमाप, मंजूर आराखडा आणि अतिक्रमणांवरील कारवाईबाबत NHAI कडे स्पष्टीकरणाची मागणी

घोगरगाव : प्रतिनिधी सागर शेळके

 

नगर–सोलापूर महामार्गालगत घोगरगाव परिसरात NHAIच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली असून, कामाचा दर्जा, प्रत्यक्ष मोजमाप, मंजूर आराखडा तसेच महामार्गालगतच्या अतिक्रमणांवरील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

या संदर्भात पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांनी संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीवरून संपर्क करून कामाबाबत विचारणा केली असता, ठेकेदाराने ‘साहेबांचा आदेश आहे’ असे सांगितल्याचे शेळके यांनी सांगितले. त्यानंतर शेळके यांनी ‘कोणत्या साहेबांचा आदेश आहे? संबंधित अधिकाऱ्यांचे नाव काय?’ अशी विचारणा केली. मात्र संबंधित अधिकाऱ्याचे नाव स्पष्ट करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

 

त्यामुळे ‘साहेबांचा आदेश’ नेमका कोणाचा होता, हा आदेश लेखी स्वरूपात आहे का आणि संबंधित आदेशाची NHAIच्या कार्यालयीन नोंदीत नोंद आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत NHAI प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

गटार कामाची मंजूर लांबी, रुंदी व खोली किती आहे? प्रत्यक्ष कामाचे मोजमाप कोणी केले? Measurement Book (MB) मध्ये नोंद करण्यात आली आहे का? वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात आली आहे का? कामाची मंजूर किंमत किती आहे आणि आतापर्यंत किती रक्कम अदा करण्यात आली आहे, याची माहितीही सार्वजनिक करावी, अशी मागणी आहे.

 

तसेच महामार्गाच्या हद्दीचे अधिकृत मोजमाप झाले आहे का, गटाराला योग्य उतार देण्यात आला आहे का आणि पावसाचे पाणी योग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

महामार्गालगतची दुकाने, हॉटेल्स व इतर व्यावसायिक आस्थापनांच्या अतिक्रमणांबाबतही स्थानिक पातळीवर चर्चा आहे. संबंधित अतिक्रमणांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आहे का? किती नोटिसा बजावण्यात आल्या? नोटिसांनंतर किती ठिकाणी कारवाई झाली? सर्व संबंधितांवर समान निकषाने कारवाई केली जात आहे का, याबाबत NHAIने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

अतिक्रमणांवरील कारवाईबाबत विविध चर्चा होत असल्या तरी त्यामागे कोणताही आर्थिक किंवा अन्य प्रकारचा हस्तक्षेप आहे, असा अधिकृत पुरावा सध्या समोर आलेला नाही. त्यामुळे संबंधित विभागाने कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

सागर शेळके यांनी NHAI प्रशासनाकडे ई-मेलद्वारे तक्रार करून गटार कामाची तांत्रिक तपासणी, प्रत्यक्ष मोजमाप, साहित्याची गुणवत्ता, मंजूर आराखडा, देयके आणि अतिक्रमणांवरील कारवाईची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

 

आता ठेकेदाराने सांगितलेला ‘साहेबांचा आदेश’ नेमका कोणाचा होता आणि त्या आदेशाचा अधिकृत आधार काय आहे, याबाबत NHAI प्रशासन काय स्पष्टीकरण देते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!