spot_img
spot_img
spot_img

थिटेसांगवी गावचे सुपुत्र भिमराज तुकाराम महानवर यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती*

*थिटेसांगवी गावचे सुपुत्र भिमराज तुकाराम महानवर यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती*

*श्रीगोंदा – सागर शेळके*                                    श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी गावचे सुपुत्र *भिमराज तुकाराम महानवर* यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस नाईक ते *पोलीस हवालदार* या पदावर पदोन्नती झाली आहे.

 

भिमराज महानवर हे सध्या *पोलीस ट्रेनिंग सेंटर, नानविज, दौंड (जि. पुणे)* येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिकपणाने काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन पोलीस विभागाने त्यांना पदोन्नती देऊन गौरव केला आहे.

 

त्यांच्या या यशामुळे थिटेसांगवी गावासह संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून मित्रपरिवार, ग्रामस्थ, नातेवाईक व पोलीस बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

या प्रसंगी *माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य* चे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष *सागर दयानंद शेळके* व युवा नेते ऋषीकेश देवकाते यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भिमराज महानवर यांची ही पदोन्नती तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!