अहिल्यानगर : सार्वजनिक व घरगुती उत्कृष्ट आरास स्पर्धा २०२६ मध्ये विघ्नहर्ता प्रतिष्ठान मोरया मित्र मंडळाने उत्कृष्ट आरास सादर केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त केला.
विचार भारती, चंद्रा एजन्सीज व बनसीमहाराज मिठाईवाले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. ज्योतीताई गाडे (महापौर, अहिल्यानगर मनपा), प्रमुख पाहुणे मा. श्री. धनंजय जाधव (उपमहापौर),भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. अनिल मोहिते साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विघ्नहर्ता प्रतिष्ठान मोरया मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या आकर्षक आरास व गणेशोत्सवातील सजावटीचे उपस्थितांनी कौतुक केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, पुढील वर्षीही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

















