spot_img
spot_img
spot_img

सिद्धेश्वर मंदिरासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; हॅलोजन व लाउडस्पीकर बसविले

सिद्धेश्वर मंदिरासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; हॅलोजन व लाउडस्पीकर बसविले

 

मांडवगण | तालुका श्रीगोंदा प्रतिनिधी – सागर शेळके

मांडवगण ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर महादेव मंदिरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांकडून पुढाकार घेण्यात आला आहे. मंदिरात बल्बची सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण राहत होते. ही बाब लक्षात घेऊन गावातील श्री. शिवाजी गवांदे यांनी मंदिरात हॅलोजन बसवून दिला. त्यामुळे मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

 

तसेच मंदिरातील लाउडस्पीकर खराब झाल्यामुळे ग्रामस्थांना सकाळ-संध्याकाळची आरती ऐकू येत नव्हती. ही बाब श्री. अंबादास शेटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मंदिरात नवीन लाउडस्पीकर बसवून दिला. त्यामुळे आता मंदिरातील आरतीचा आवाज ग्रामस्थांना ऐकू येणार आहे.

ग्रामदैवताच्या मंदिरासाठी केलेल्या या योगदानाबद्दल सिद्धेश्वर महादेव व मांडव्यऋषी देवस्थान A270 चे अध्यक्ष श्री. पोपट खराडे (गुरव) यांच्या वतीने मंदिरात श्री. शिवाजी गवांदे व श्री. अंबादास शेटे यांचा सत्कार करण्यात आला.

 

ग्रामदैवताच्या सेवेसाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत असून, मंदिरातील आवश्यक सुविधांसाठी अशाच प्रकारे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!