दैनिक लोकपरिवर्तनतर्फे राजेंद्र नष्टे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
राशीन प्रतिनिधी ( ऋषभ परदेशी )
आमदार संग्रामभैया जगताप, विठ्ठलराव लंघे, काशीनाथ दाते व अक्षयदादा कर्डिले यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान

अहिल्यानगर : शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे राजेंद्र नष्टे यांना दैनिक लोकपरिवर्तनतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथील आयुर्वेद कॉलेजसमोरील नाथकृपा सांस्कृतिक भवन येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास आमदार संग्रामभैया जगताप, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशीनाथ दाते आणि आमदार अक्षयदादा कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. दैनिक लोकपरिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ तसेच अशोक सूर्यवंशी यांच्या हस्ते राजेंद्र नष्टे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नष्टे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानामुळे राशीन व परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या दीर्घकालीन कार्याचा हा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
समाज विकास संस्थेचे अध्यक्ष ए. एस. काझी, सचिव दिलीप नष्टे, वासुदेव फर्निचरचे मेघराज ऊर्फ आप्पुशेठ बजाज व प्रकाश शेठ बजाज, शिवाजीराव सुरवसे, अविनाश दोशी यांच्यासह विविध डॉक्टर, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी नष्टे यांचे अभिनंदन केले.
राशीनमधील श्री जगदंबा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, हशु आडवाणी विद्यालय तसेच जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनीही त्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राजेंद्र नष्टे यांना मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेणारा सन्मान ठरला आहे.

















