spot_img
spot_img
spot_img

दुष्काळ निवारणासाठी राशीनमध्ये भक्तिभावाने चंडीयाग; श्री जगदंबा देवीच्या चरणी पावसासाठी साकडे

दुष्काळ निवारणासाठी राशीनमध्ये भक्तिभावाने चंडीयाग;  श्री जगदंबा देवीच्या चरणी पावसासाठी साकडे

 

                                                                                            राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :

कर्जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडावा, दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि शेतकरी, पशुधन व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, या मंगलमय भावनेतून राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिराच्या सिंहाच्या आवारात शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) भक्तिमय वातावरणात हवनयुक्त चंडीयाग, महादेवाचा रुद्राभिषेक व वरुणदेवता पूजन करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र, अहिल्यानगर दक्षिण विभाग आणि श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट, राशीन यांच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रोच्चार, हवनकुंडातील अग्निहोत्र आणि भक्तिभावाने करण्यात आलेल्या पूजनामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

या धार्मिक सेवेसाठी राशीन, कर्जत, मिरजगाव, माहिजळगाव, घोगरगाव, जामखेड, श्रीगोंदा, बीड, दौंड, करमाळा, भिगवण, बारामती तसेच अहिल्यानगर शहर आदी विविध भागांतून महिला-भगिनी व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ७०० भाविकांनी या धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.

 

चंडीयागाच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी तसेच वरुणराजाची कृपादृष्टी लाभून सर्वत्र भरपूर पाऊस पडावा, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. महादेवाच्या रुद्राभिषेकासह वरुणदेवतेचे पूजन करून श्री आई जगदंबा देवी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साकडे घालण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राशीन येथील श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिक विधींमध्ये भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेत परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले.

 

“पाऊस भरपूर पडू दे, धरती हिरवीगार होऊ दे आणि शेतकरी सुखी होऊ दे” या सामूहिक भावनेने पार पडलेल्या या धार्मिक उपक्रमातून राशीनसह कर्जत तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुख-समृद्धी व जलसमृद्धीची प्रार्थना करण्यात आली.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!