spot_img
spot_img
spot_img

कर्जत तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या प्रश्नावर ‘युक्रांद’चे घंटानाद आंदोलन

कर्जत तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या प्रश्नावर ‘युक्रांद’चे घंटानाद आंदोलन

 

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी)                                                                                                              : कर्जत तालुक्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचे दरपत्रक व डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता दर्शनी भागात लावावी, रुग्णांकडून जादा व अवाजवी शुल्क आकारू नये, अनावश्यक तपासण्या व उपचार लादू नयेत, तसेच खासगी लॅब व रुग्णालयांची नियमित तपासणी करावी, या मागण्यांसाठी युवक क्रांती दलाच्या (युक्रांद) वतीने सोमवारी (दि. २१) कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेधी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाला युक्रांदच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, डॉ. दिलीप व्हरकटे, डॉ. मारुतराव जाधव व डॉ. अशोक लिंगडे यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली.

युक्रांदने यापूर्वी केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी तालुक्यातील ३६ खासगी हॉस्पिटलची तपासणी केली. त्यापैकी १८ हॉस्पिटलमध्ये विविध त्रुटी आढळून आल्या असून संबंधित हॉस्पिटल चालकांना लेखी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. उर्वरित खासगी रुग्णालयांची तपासणीही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

 

त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांमध्ये आवश्यक सुधारणा न केल्यास शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सायंकाळी ५ वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले.

दरम्यान, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध मागण्यांसाठी युक्रांदने घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले.

 

या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे पोपट शेटे, लखन पारसे, अंकुश साळवे, ॲड शुभम पानसरे.भाऊसाहेब जावळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष जाधव, जितेंद्र शेटे, राशीन येथील स्वप्नपूर्ती युवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे विकी साळवे, मराठा सेवा संघाचे दिलीप कानगुडे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!