spot_img
spot_img
spot_img

निंबोडी ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंद प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकावर शिस्तभंग

निंबोडी ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंद प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकावर शिस्तभंग

 

नोंद कोणी केली याचा उलगडा नसल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

 

अहिल्यानगर | प्रतिनिधी श्रीगोंदा. .. सागर शेळके                                                                                            नगर तालुक्यातील निंबोडी ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंद व फेरफार प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन ग्रामसेवक संजय रामभाऊ पुंड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील तरतुदींनुसार संबंधित शिक्षेचा आदेश अंतिम केला असून, त्याची नोंद सेवापुस्तकात घेण्याचे निर्देश दिले आहेत.

निंबोडी ग्रामपंचायतीअंतर्गत सिटी सर्व्हे क्रमांक २३४, २३६, २३५, २३३ आणि २३० या मालमत्तांच्या नोंदी व फेरफार प्रक्रियेबाबत तक्रार करण्यात आली होती. संबंधित मालमत्ता नोंदी करताना आवश्यक प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता झाली होती का, याबाबत तक्रारीत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

 

या प्रकरणी विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती अहिल्यानगर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानंतर तत्कालीन ग्रामसेवक संजय रामभाऊ पुंड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांनी आपला खुलासा सादर केला.

खुलाशामध्ये संबंधित नोंद ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या ठरावाने मंजूर झालेली नसल्याचे, तसेच ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ मधील संबंधित नोंद आपण केलेली नसल्याचे आणि त्यावरील स्वाक्षरीदेखील आपली नसल्याचे त्यांनी नमूद केल्याचे अंतिम आदेशात नमूद आहे.

दरम्यान, चौकशी अहवाल, उपलब्ध कागदपत्रे आणि संबंधितांचा खुलासा यांचा विचार करून पंचायत समिती प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई पुढे नेली. अंतिम आदेशाद्वारे तत्कालीन ग्रामसेवक संजय पुंड यांच्यावरील शिस्तभंगाची शिक्षा अंतिम करण्यात आली असून, त्याची नोंद सेवापुस्तकात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

नोंद कोणी केली? प्रशासनासमोर प्रश्न कायम

 

या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित मालमत्ता फेरफाराची नोंद नेमकी कोणी केली, याबाबत चौकशी अहवालात निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

 

संबंधित नोंदीच्या प्रक्रियेत तत्कालीन सरपंच शंकर बेरड यांच्या सहीखाली ९ जानेवारी २०२३ अशी तारीख नमूद असल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, प्रत्यक्ष नोंद कोणी केली, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने या प्रकरणाचा तपास करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

याच पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची ओळख पटल्यास तिच्याविरुद्ध, अन्यथा अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.

 

मालमत्ता नोंदी, फेरफार प्रक्रिया आणि ग्रामपंचायतीच्या अधिकृत अभिलेखांमध्ये नोंदी करताना नियमांचे पालन झाले आहे का, याबाबत या कारवाईमुळे प्रशासनाने गांभीर्याने भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

 

या प्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कारवाईतून संबंधित नोंद कोणी केली आणि त्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

या प्रकरणाच्या पाठपुराव्यात : अविनाश अकोलकर, सागर शेळके, अमोल सानप, सुभाष भोर, राजेंद्र खोमणे, अशोक खुताळ, गिरिधर जगताप.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!