spot_img
spot_img
spot_img

*अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम ग्रामपंचायत स्तरावर माहिती अधिकार दिन साजरा होणार; दीपक पाचपुते यांच्या तक्रारीनंतर आदेश* 

*अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम ग्रामपंचायत स्तरावर माहिती अधिकार दिन साजरा होणार; दीपक पाचपुते यांच्या तक्रारीनंतर आदेश*

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर शेळके):                                                                            माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बाबत ग्रामीण भागात जनजागृती वाढविण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर 28 सप्टेंबर माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी केलेल्या तक्रार व पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत हालचाल केली आहे.

जिल्हा परिषद अहिल्यानगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) दादासाहेब गुंजाळ यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना पत्राद्वारे सूचना दिल्या असून, पंचायत समिती स्तरावरून सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतींना माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत अवगत करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

आदेशानुसार, माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ग्रामसभांमधून नागरिकांना माहिती अधिकाराची माहिती देणे, कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच शासनाच्या तरतुदीनुसार प्रचार व प्रसिद्धीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या माहितीच्या अधिकाराबाबत जागृत करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

दीपक पाचपुते यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत माहिती अधिकार दिन केवळ कार्यालयीन स्तरावर न साजरा करता तो ग्रामपंचायत स्तरावर नेण्याची मागणी केली होती. नागरिकांमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत जागरूकता निर्माण झाल्यास प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व अधिक बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले होते.

 

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयामुळे माहिती अधिकार कायद्याची माहिती ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून ग्रामसभांमधून माहिती अधिकाराबाबत व्यापक जनजागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माहिती अधिकार चळवळीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 28 सप्टेंबर रोजी विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!