spot_img
spot_img
spot_img

पंचायत समिती कर्जतसमोर घंटानाद आंदोलन; युवक क्रांती दलाच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

पंचायत समिती कर्जतसमोर घंटानाद आंदोलन; युवक क्रांती दलाच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

 

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :                                                                                                   तालुका आरोग्य अधिकारी यांच्या निषेधार्थ युवक क्रांती दल, कर्जत तालुक्याच्या वतीने आज पंचायत समिती कर्जत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. विविध आरोग्यविषयक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राशीन शहराच्या वतीने लेखी पत्र देऊन पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवसेना कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख सुभाष जाधव, राशीन शहर प्रमुख जितेंद्र शिवदास शेटे, ॲड. विकी साळवे,सप्तर्षी साहेब, युवक क्रांती दलाचे शहराध्यक्ष दादा राऊत, राज्य संघटक आप्पा अनारसे, विनोद सोनवणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आंदोलनादरम्यान संबंधित आरोग्यविषयक प्रश्नांची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

spot_img

Related Articles

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा...

🚨 नांदगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई   मध्य प्रदेशातील विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात आणताना कंटेनर पकडला; १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी श्रीगोंदा ( सागर...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!  ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत...

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राशीन ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरूच!   ग्रामसभेचा ठराव धाब्यावर? महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची प्रतीक्षा; उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप   राशीन (प्रतिनिधी : ऋषभ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!