spot_img
spot_img
spot_img

वार्ड क्रमांक १ चा राजा’ यंदा विराजमान होणार नाही; गणेशोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी!

‘वार्ड क्रमांक १ चा राजा’ यंदा विराजमान होणार नाही; गणेशोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी!

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :

गणेशोत्सव म्हटला की आकर्षक सजावट, रोषणाई, देखावे आणि लाखो रुपयांचा खर्च हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, यंदा दुष्काळाच्या सावटाखाली होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन राशीन शहरातील ‘वार्ड क्रमांक १ चा राजा’ गणेश मंडळाने एक आगळावेगळा आणि समाजाला दिशा देणारा निर्णय घेतला आहे.

 

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणपतीची स्थापना न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी जमा होणारा तसेच मंडळाच्या उत्सवावर खर्च होणारा निधी यंदा राशीन शहरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी खर्च करण्याचा मानस मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

 

या निर्णयामागे मंडळाचे सदस्य विनोद जाधव यांची शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशील भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. दरवर्षी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च यंदा केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी वापरावा, अशी भूमिका मंडळाने घेतली आहे.

 

दुष्काळाचे संकट असताना उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून तो पैसा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा हा निर्णय गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरत आहे. ‘उत्सवापेक्षा माणूस महत्त्वाचा’ या भावनेतून घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करावा आणि गरजू शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे यावे, असा संदेशही ‘वार्ड क्रमांक १ चा राजा’ मंडळाच्या या निर्णयातून दिला जात आहे.

 

गणपतीच्या मूर्तीऐवजी यंदा शेतकऱ्यांच्या मदतीचा संकल्प!

 

विनोद जाधव आणि ‘वार्ड क्रमांक १ चा राजा’ मंडळाच्या या निर्णयाने राशीनमधील गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची नवी दिशा मिळाली असून, महाराष्ट्रासाठीही हा एक आगळावेगळा संदेश ठरला आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!