spot_img
spot_img
spot_img

कर्जत तालुक्यात ठाकरे गटाचा संघटनात्मक एल्गार! जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवींचा झंझावाती दौरा; राशीन जि.प. गटातून बैठकांना सुरुवात, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कर्जत तालुक्यात ठाकरे गटाचा संघटनात्मक एल्गार!

 

जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवींचा झंझावाती दौरा; राशीन जि.प. गटातून बैठकांना सुरुवात, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

 

राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी आज कर्जत तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये बैठका घेत संघटनात्मक बांधणीला वेग दिला. या दौऱ्याची सुरुवात राशीन जिल्हा परिषद गटापासून झाली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येत आगामी काळातील पक्षसंघटन, मतदार यादी व जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

 

राशीन येथे झालेल्या कार्यक्रमात तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव यांची फेरनिवड तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या नव्याने झालेल्या नियुक्त्यांबद्दल जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुका संघटक दीपक गांगर्डे, विधानसभा प्रमुख सुभाष जाधव, तालुका प्रसिद्धीप्रमुख दीपक मांडगे, उपतालुकाप्रमुख अजित कानगुडे, विभागप्रमुख संदीप मोरे, विधानसभा संघटक योगेश मांडगे यांचा समावेश होता.

 

मतदार यादीपासून दुष्काळापर्यंत मुद्द्यांवर दळवींचा थेट प्रहार

यावेळी राजेंद्र दळवी यांनी बीएलएच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील मतदार याद्यांची तपासणी करून मतदारांची नावे अचूक आहेत की नाहीत, याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन पदाधिकारी व शिवसैनिकांना केले.

 

तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पंचनामे, नुकसानभरपाई, कर्जमाफीच्या प्रश्नासह वाढती महागाई आणि सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर संघटनेने आवाज उठवावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

 

या सत्कार समारंभाचे आयोजन शिवसेना राशीन शहरप्रमुख जितेंद्र शेटे, उपशहरप्रमुख अमृत जंजिरे, संदीप राऊत, शाखाप्रमुख सागर पागी, सुनील काका दडगळ, ऋषिकेश परदेशी, युवासेनेचे अक्षय भिताडे आदी पदाधिकाऱ्यांनी केले.

 

कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव, युवासेनेचे अॅड. अविनाश मते, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, महेश तोरडमोल, उपविभागप्रमुख संदीप आगवन, ज्येष्ठ नेते छगन मोरे, दादासाहेब लोंढे, सनी मांढरे, दिलीप लोंढे, शरद क्षीरसागर, नानासाहेब मस्के, पोपटराव धनावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरप्रमुख जितेंद्र शेटे यांनी केले, तर उपशहरप्रमुख अमृत जंजिरे यांनी आभार मानले.

 

कर्जत तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात बैठका घेत संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या दौऱ्याला सुरुवात झाल्याने आगामी काळात ठाकरे गटाच्या संघटनात्मक हालचालींना वेग येणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!