spot_img
spot_img
spot_img

कर्जतमध्ये डॉ. नितीन तोरडमल यांच्या कामाचा धडाका!

कर्जतमध्ये

डॉ. नितीन तोरडमल यांच्या कामाचा धडाका!

 

शिवसेना तालुकाप्रमुख पदाला एक वर्ष पूर्ण; संघटन बांधणीपासून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांपर्यंत सतत आक्रमक पाठपुरावा

Oplus_16908288

कर्जत | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :

 

माणुसकी, संघटन आणि शिवसेनेची विचारधारा… यांच्या बळावर पुढे वाटचाल! या भूमिकेतून डॉ. नितीन तोरडमल, शिवसेना कर्जत तालुकाप्रमुख यांच्या पदाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात कर्जत तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

 

पद मिळाले, पण काम थांबले नाही; उलट जनतेच्या प्रश्नांसाठी धावपळ अधिकच वाढली! वंचित, शोषित, गरीब आणि गरजू नागरिकांच्या अडचणींसाठी मदतीचा हात पुढे करत डॉ. तोरडमल यांनी जनसेवेचा धडाका कायम ठेवला आहे.

 

दवाखान्यातील प्रश्न असो, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील काम असो; विविध शासकीय विभागांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती चर्चेत आहे. एखाद्या नागरिकाचा प्रश्न घेऊन संबंधित कार्यालयाचा दरवाजा ठोठावण्यापासून ते त्याच्या निकालासाठी पाठपुरावा करण्यापर्यंत त्यांचा कामाचा झपाटा सुरू असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

 

शाखा बांधणीपासून जनतेच्या प्रश्नांपर्यंत… कामाचा झंझावात!

 

कर्जत तालुक्यात शिवसेनेच्या शाखा अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संपर्क, संघटनात्मक बांधणी आणि जनतेच्या प्रश्नांवर भूमिका घेण्याचे काम वर्षभर सुरू राहिले. अन्यायाविरोधात आवाज आणि गरजूंसाठी मदतीचा हात अशी कार्यपद्धती पुढे नेण्याचा प्रयत्न डॉ. तोरडमल यांनी केला आहे.

 

२४ तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहण्याचा निर्धार, विविध कार्यालयांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा आणि तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी सुरू असलेली धडपड यामुळे त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

 

एक वर्ष पूर्ण… पण धडाका कायम!

आगामी काळात कर्जत तालुक्यात संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आणखी जोमाने आवाज उठविण्याची भूमिका डॉ. नितीन तोरडमल यांच्या कार्यातून पुढे येत आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!