spot_img
spot_img
spot_img

राशीनमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट जोडणारा नवा उपक्रम; महिलांची मेहनत वाचविण्यासाठी ‘क्लिनिंग – ग्रेडिंग धान्य’ आण ि नैसर्गिक ‘कोल्ड प्रेस ऑईल’चा नवा पर्याय !

🌾 राशीनमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट जोडणारा नवा उपक्रम; महिलांची मेहनत वाचविण्यासाठी ‘क्लिनिंग-ग्रेडिंग धान्य’ आणि नैसर्गिक ‘कोल्ड प्रेस ऑईल’चा नवा पर्याय!

राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :

 

राशीनच्या कृषीविश्वात आता एक नवी सुरुवात होणार आहे! शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ग्राहकांच्या घरापर्यंत दर्जेदार कृषी उत्पादन पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम म्हणून आईसाहेब अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, राशीनच्या आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, शाखा क्र. १चा भव्य शुभारंभ गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

विशेष म्हणजे, महिलांच्या रोजच्या स्वयंपाकघरातील मेहनतीचा विचार करून क्लिनिंग व ग्रेडिंग केलेले स्वच्छ, दर्जेदार धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे धान्य निवडणे, साफ करणे आणि अनावश्यक कचरा काढण्याचा त्रास कमी होणार असून, धान्य थेट गिरणीत दळण्यासाठी नेण्यासारखे ग्राहकांना सोयीचे ठरणार आहे.

 

🛢️ ‘कोल्ड प्रेस ऑईल’ — रसायनविरहित नैसर्गिक प्रक्रियेचा पर्याय!

या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे कोल्ड प्रेस ऑईल. तेलबियांवर पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करून तयार होणाऱ्या या तेलाला केमिकलचा वापर न करता १००% नैसर्गिक प्रक्रियेचा पर्याय म्हणून ग्राहकांसमोर आणले जात आहे. आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले तेल निवडू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.

 

‘शेतकरी ते ग्राहक — विश्वासाची थेट वाटचाल’ या संकल्पनेतून शेतकरी सभासदांच्या मेहनतीला बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच ग्राहकांना स्वच्छ, दर्जेदार व प्रक्रिया केलेली उत्पादने उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

 

📍 ठिकाण : आईसाहेब अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, शाखा क्र. १, जुना कुंभारगाव रोड, कैकाडी गल्ली, सचिन जाधव यांच्या युनियन बँक मिनी शाखेजवळ, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.

 

या भव्य शुभारंभ सोहळ्यास नागरिक, महिला, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांनी आवर्जून उपस्थित राहून नव्या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

श्री. अमोल संजय जाधव

व्यवस्थापकीय संचालक (MD)

 

श्री. संतोष वसंत कांबळे

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

 

आईसाहेब अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, राशीन

 

आपला विश्वास — आमची ताकद!

आपले सहकार्य — आमची प्रेरणा!

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!