शाळेसाठी मदतीचे हात पुढे!
राशीन जिल्हा परिषद शाळेला साऊंडबॉक्स, किचनशेड पत्रे व स्लाइडिंग खिडक्यांची भेट
राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राशीन मुले येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विविध देणगीदारांनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी शाळेला किचनशेडचे नवीन पत्रे, दोन साऊंडबॉक्स तसेच संगणक लॅबसाठी स्लाइडिंग खिडक्या भेट देण्यात आल्या.
हॉटेल बेलेकर गार्डनचे संचालक दीपक बेलेकर यांनी शाळेच्या किचनशेडसाठी नवीन पत्रे बसवून दिली. हॉटेल अन्नपूर्णाचे संचालक शेखर शिवाजीराव सुरवसे यांनी शाळेला दोन साऊंडबॉक्स भेट दिले. तसेच इंजिनियर गणेश बनसोडे यांनी संगणक लॅबसाठी स्लाइडिंग खिडक्या भेट दिल्या.
या सामाजिक योगदानाबद्दल सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार साळवे, उपाध्यक्ष निलेश चव्हाण, मुख्याध्यापक अशोक नेवसे, मुलींच्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विठ्ठल साळवे, तसेच किरण जाधव व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी बापूराव वावगे, प्रदीप कोकाटे, राजीव राठोड, भास्कर घोडके, रमेश मासाळ, गणेश पंडित, संतोष मुसळे, रावसाहेब ढवळे, उज्वला पंडित, वृषाली धेंडे, स्मिता गुणवरे, तृप्ती भापकर, विजया जगताप, भारती जाधव, रेणुका चव्हाण, सोनाली रसाळ यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेऊन लोकसहभागातून शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले. देणगीदारांच्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.

















