spot_img
spot_img
spot_img
spot_img

पुरस्कारांचा झपाटा ! प्राचार्य राजेंद्र नष्ट े यांचा पुन्हा दिमाखदार सन्मान; राशीनच े नाव महाराष्ट्रभर चर्चेत

पुरस्कारांचा झपाटा! प्राचार्य राजेंद्र नष्टे यांचा पुन्हा दिमाखदार सन्मान; राशीनचे नाव महाराष्ट्रभर चर्चेत

राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी :
हसू अडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र नारायण नष्टे सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे २०२६ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव येथे रविवारी १३ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याची विविध संस्थांकडून सातत्याने दखल घेतली जात असल्याने ‘पुरस्कारांचा एकामागून एक झपाटा’ अशी चर्चा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात रंगली आहे.

प्राचार्य नष्टे सरांच्या कार्यामुळे राशीनच्या शैक्षणिक क्षेत्राचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे चर्चेत आले असून, त्यांच्या या यशाबद्दल शिक्षणप्रेमी, पालक, विद्यार्थी व राशींच्या नागरिकांकडून व विजय दादा देशमुख व संभाजी राजे राजेभोसले अल्लाउद्दीन काझी दिलीप नष्टे भुजंग कदम अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे शहराच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे, आमदार शंकरराव जगताप, तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

– काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली… अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसल ं !

🌙✨ काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली… अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसलं! ✨🌙   दिवसभराच्या धावपळीनंतर आकाशाने जणू क्षणभर विसावा घेतला… नभाच्या अथांग पटलावर उमटलेली चंद्रकोर आणि तिच्या...

आला रे आला… गणपती बाप्पा आला ! गणेशाच्या जयघोषान े राशीनची बाजारपेठ दुमदुमली; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे

आला रे आला... गणपती बाप्पा आला! गणेशाच्या जयघोषाने राशीनची बाजारपेठ दुमदुमली; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी : “गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!” या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!