spot_img
spot_img
spot_img
spot_img

व्यायामशाळा कुठे? १० लाखांचा निधी नेमका गेला कुठे?

नागमठाणमधील व्यायामशाळा प्रकरण चर्चेत; बोगस कागदपत्रांच्या आरोपांनंतरही कारवाईची प्रतीक्षा

नागमठाण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर | प्रतिनिधी : ऋषी परदेशी

नागमठाण येथे शासकीय अनुदानातून मंजूर झालेल्या कथित व्यायामशाळेच्या १० लाख रुपयांच्या निधीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामस्थ नामदेव शिंदे यांच्या तक्रारीनुसार तत्कालीन सरपंच देविदास सूर्यभान महारनवर व बजरंग महारनवर यांच्याबाबत विविध आरोप करण्यात आले आहेत.

‘राजमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण विकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये गट नं. १८/१ येथे व्यायामशाळा उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाकडे १० लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार प्रस्तावासोबत सादर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत ठराव, ग्रामसेवकाची सही व शिक्का, बांधकाम परवाना आणि महसुली दाखल्याबाबत बनावटपणाचे आरोप करण्यात आले आहेत. व्यायामशाळेचे बांधकाम न करता दुसऱ्या इमारतीचा फोटो दाखवून निधी काढण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

व्यायामशाळेच्या इमारतीत घर?

ज्या इमारतीला व्यायामशाळा म्हणून दाखवण्यात आले, त्या ठिकाणी सध्या कुटुंब वास्तव्यास असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तसेच तेथे व्यायामाचे साहित्य उपलब्ध आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RTIमधून कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनंतर सही व शिक्क्यांबाबत प्रश्न उपस्थित झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी २०२१ मध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नाशिक येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या.

त्यानंतरही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्जतपासून मंत्रालय स्तरापर्यंत सुमारे दहा अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टद्वारे तक्रारी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

१० लाखांच्या निधीचा हिशेब कधी लागणार?

व्यायामशाळा प्रत्यक्षात बांधली का? निधीचा वापर नेमका कुठे झाला? संबंधित कागदपत्रे खरी आहेत का? याची स्वतंत्र चौकशी करून संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या प्रकरणात प्रशासन आता कोणती भूमिका घेणार आणि चौकशीअंती काय कारवाई होणार, याकडे नागमठाण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

– काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली… अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसल ं !

🌙✨ काळोखाच्या कुशीत चंद्रकोरी उमलली… अन् तिच्या सोबतीला एक चांदणं अलगद हसलं! ✨🌙   दिवसभराच्या धावपळीनंतर आकाशाने जणू क्षणभर विसावा घेतला… नभाच्या अथांग पटलावर उमटलेली चंद्रकोर आणि तिच्या...

आला रे आला… गणपती बाप्पा आला ! गणेशाच्या जयघोषान े राशीनची बाजारपेठ दुमदुमली; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे

आला रे आला... गणपती बाप्पा आला! गणेशाच्या जयघोषाने राशीनची बाजारपेठ दुमदुमली; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे राशीन | प्रतिनिधी ऋषभ परदेशी : “गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!” या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!