छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजमधून जखमी घुबडाचे रेस्क्यू; वनविभागाची तत्परता!
श्रीगोंदा | प्रतिनिधी सागर शेळके
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या घुबडाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सुरक्षितपणे रेस्क्यू केले. वनविभागाच्या या कार्यामुळे वन्यजीव संरक्षणाप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

श्रीमती दिपाली भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र जाधव, वनरक्षक श्रीगोंदा, तसेच चंद्रकांत मरकड, वनरक्षक चिंबळे यांनी जखमी घुबडाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले.
महाविद्यालय परिसरात जखमी अवस्थेत घुबड आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही केली. जखमी पक्ष्यांना योग्य वेळी मदत मिळणे आवश्यक असून, अशा घटनांमध्ये नागरिकांनीही संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे.
वन्यजीव संकटात असल्यास १९२६ वर संपर्क साधा!
वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास किंवा वन्यजीवांशी संबंधित मदतीची आवश्यकता असल्यास महाराष्ट्र वनविभागाच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १९२६ (‘हॅलो फॉरेस्ट’ सेवा) वर संपर्क साधावा. नागरिकांनी जखमी पक्षी किंवा वन्यप्राण्यांना स्वतःहून हाताळणे टाळावे आणि वनविभागाला त्वरित माहिती द्यावी.
वन्यजीवांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून, वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.


















