spot_img
spot_img
spot_img

कैकाडी समाजाच्या न्यायासाठी तात्यासाहेब माने मैदानात!

कैकाडी समाजाच्या न्यायासाठी तात्यासाहेब माने मैदानात!

 

अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड; २५-३० वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल

 

राशीन (प्रतिनिधी : ऋषभ परदेशी) :                                                                                                    अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब माने यांची निवड करण्यात आली आहे. कैकाडी तसेच भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांसाठी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणाऱ्या माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाकडून मदत मिळवून देण्यापासून ते अन्याय, अत्याचार व विविध सामाजिक प्रश्नांविरोधात आंदोलने उभारण्यापर्यंत माने यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कैकाडी समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या निवडीकडे महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या माध्यमातून समाजाला शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती करणे तसेच सामाजिक हक्कांसाठी संघटित लढा उभारणे, या दिशेने महासंघाच्या माध्यमातून काम करण्यावर भर दिला जाणार आहे.

महाराष्ट्रातील कैकाडी समाजाच्या प्रवर्गाबाबतही विविध भागांमध्ये वेगवेगळी वर्गवारी असल्याचा मुद्दा महासंघाकडून उपस्थित केला जात आहे. विदर्भात कैकाडी समाजाचा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गात समावेश असताना पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या प्रवर्गात वर्गीकरण असल्याने समाजात असलेल्या या प्रश्नावर जनजागृती करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिकाही मांडण्यात आली.

 

अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय मेडे, कार्याध्यक्ष दिगंबर जाधव व उपनेते अमोल माने यांच्या आदेशानुसार तात्यासाहेब माने यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 

या निवडीस राज्य सरचिटणीस गोरख माने, राज्य संघटक विनोद जाधव, राज्य उपाध्यक्ष विश्वासराव माने, मोहनराव जाधव, सुधाकर जाधव, शेखर जाधव, किसनराव जाधव, संजूबाबा गायकवाड, बाळासाहेब माने, लक्ष्मण माने, अनिलराव जाधव, लक्ष्मण गायकवाड, राज्य महिला उपाध्यक्ष संगीताताई माने, राज्य महिला सचिव रेखाताई माने, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष जीत कोरवी, उपाध्यक्ष संजय माने, महिला उपाध्यक्ष कमल जाधव, महिला सचिव ललिता मॅडम, युवक अध्यक्ष राजेंद्र माने, तसेच गिरीधर कोरवी, शीला माने, शशिकला जाधव यांच्यासह राज्यातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

तात्यासाहेब माने यांच्या निवडीबद्दल सुरेशराव जाधव, जालिंदर जाधव, नितीन माने, विनोद जाधव, किरण जाधव, संजय माने, मच्छिंद्र माने, दिलीप जाधव, मच्छिंद्र जाधव, बाळासाहेब जाधव, पिंटू माने, विशाल माने यांच्यासह समाजबांधवांनी अभिनंदन केले.

 

पश्चिम महाराष्ट्रातील कैकाडी समाजाला संघटित करून शिक्षण, रोजगार, सामाजिक हक्क आणि न्यायासाठी प्रभावी जनआंदोलन उभारण्याचे आव्हान आता तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वासमोर आहे.

spot_img

Related Articles

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची...

सणासुदीच्या काळात FDA ची धडक कारवाई; १०.८० लाखांचा अन्नसाठा जप्त राहुरी, कोपरगावातील तीन अन्न व्यवसायांवर छापे; खाद्यतेल, मसाले व मिरची पावडरच्या गुणवत्तेची तपासणी   राशीन (वार्ताहर :...

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव! नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक

राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने महादेव सायकर सरांचा गौरव!   नांदगावच्या मुख्याध्यापकांचा राशीनमध्ये नागरी सत्कार; शैक्षणिक योगदानाचे कौतुक   राशीन (वार्ताहर : ऋषभ परदेशी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!